शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

वीजप्रवाह सुरू झाल्याने कर्मचाºयाचा दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:55 IST

इंदिरानगर : शहरातील इंदिरानगर भागातील मोदकेश्वर चौकात बिघाड दुरुस्तीसाठी विद्युत खांबावर चढलेला महावितरणचा कर्मचारी शॉक लागून जागीच गतप्राण झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.१७) घडली. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

विजेचा शॉक लागून खांबावरच अत्यवस्थ झालेले समीर वाघ यांना खांबावरून खाली उतरविताना कर्मचारी.

इंदिरानगर : शहरातील इंदिरानगर भागातील मोदकेश्वर चौकात बिघाड दुरुस्तीसाठी विद्युत खांबावर चढलेला महावितरणचा कर्मचारी शॉक लागून जागीच गतप्राण झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.१७) घडली. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.देवदत्त सोसायटीच्या परिसरातील वीजपुरवठ्यात बिघाड झाल्याची तक्रार महावितरण कार्यालयास प्राप्त झाली होती. सदर तक्रारीचे निवारण करण्यासाठी कर्मचारी समीर वाघ (२६), हेमराज कडेकर (३५) हे दोघे सकाळी साडेदहाच्या सुमारास दाखल झाले. समीर वाघ हे बिघाड दुरुस्तीसाठी खांबावर चढले तेव्हा विजेचा प्रवाह बंद करण्यात आला होता. हेमराज कडेकर हे खांबाजवळ उभे होते. काही मिनिटे झाल्यानंतर अचानकपणे वीजपुरवठा सुरू झाल्याने खांबावर दुरुस्ती करत असलेले समीर वाघ यांना विजेचा धक्का बसला व ते जिवाच्या आकांताने ओरडले. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर हेमराज कडेकर यांनी तत्काळ भ्रमणध्वनीवरून, ‘वीजप्रवाह का सुरू केला ? तातडीने बंद करा, काम सुरू असून ‘जनमित्र’ला शॉक लागला आहे, असे कळविले’ त्यावेळी तातडीने पुन्हा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आणि हेमराज यांनी शिडीवरून खांब गाठला. यावेळी त्यांनी खांबावर बसून समीर वाघ यांना वीजप्रवाह कसा सुरू झाला?वीज कर्मचाºयांनी त्या परिसरातील विद्युत पुरवठा बंद करून बिघाड दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर काही मिनिटांमध्ये वीजपुरवठा पुन्हा कसा सुरू झाला व कोणी सुरू केला? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वीजपुरवठा बंद करूनच वाघ व कडेकर विद्युत खांबाजवळ आले होते. दरम्यान, वाघ खांबावर चढले आणि काही मिनिटांत पुन्हा वीजपुरवठा सुरू झाला आणि वाघ यांचा यामुळे मृृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.