शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळ्याची ‘युनेस्को’कडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:28 IST

दर बारा वर्षांनी नाशिकच्या गोदाकाठावर भरणारा साधू-संतांचा मेळा अर्थात कुंभमेळ्याची छायाचित्रकार संजय जगताप यांनी टिपलेल्या छायाचित्रांची थेट संयुक्त राष्टÑ संघटनेच्या ‘युनेस्को’ने दखल घेतली असून, कुंभमेळा जागतिक वारसा ठरावा, यादृष्टीने पुढचे पाऊल टाकले आहे.

नाशिक : दर बारा वर्षांनी नाशिकच्या गोदाकाठावर भरणारा साधू-संतांचा मेळा अर्थात कुंभमेळ्याची छायाचित्रकार संजय जगताप यांनी टिपलेल्या छायाचित्रांची थेट संयुक्त राष्टÑ संघटनेच्या ‘युनेस्को’ने दखल घेतली असून, कुंभमेळा जागतिक वारसा ठरावा, यादृष्टीने पुढचे पाऊल टाकले आहे. नाशिकच्या कुंभमेळ्याला जागतिक वारसा मिळावा, यासाठी मुंबईच्या अखिल भारतीय संगीत नाटक अकादमीच्या वतीने प्रयत्न सुरू होते. अकादमीने जगताप यांचा गौरव करत त्यांनी काढलेल्या शेकडो छायाचित्रांमधून निवडक छायाचित्रे ‘द अ‍ॅडव्हायझर बॉडी फॉर इन्टॅजिबल कल्चरल हेरिटेज’द्वारे (एबीआयसीएचयू) युनेस्कोला सादर केली होती. यामध्ये जगताप यांनी काढलेल्या काही चित्रफितींचाही समावेश होता. सरकारच्या अकदमीचे सदस्य असलेल्या उषा राव यांनी जागतिक वारसा म्हणून कुंभमेळा ओळखला जावा, यासाठी प्रयत्न सुरू करत उत्कृष्ट छायाचित्रे शोधण्यास सुरुवात केली होती. जगताप यांनी आपल्या कलेचा खुबीने वापर करत बोलक्या छायाचित्रांच्या माध्यमातून कुंभमेळा कॅ मेºयात कैद केला. त्यांची छायाचित्रे अकादमीच्या पसंतीस खरी उतरली. राव यांनी जगताप यांचे अभिनंदन करत त्यांची छायाचित्रे नाशिकच्या कुं भमेळ्याला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यासाठी पूरक ठरतील, असा आशावाद पत्रातून व्यक्त केल्याचे जगताप यांनी सांगितले.छायाचित्रणाच्या आवडीपोटी जोपासलेल्या कलेमुळे मला माझ्या शहराला आंतरराष्टÑीय स्तरावर पोहचविण्याची संधी मिळाली. याचा मला विशेष आनंद होत असून, कुं भमेळ्यात तहान-भूक विसरून केलेल्या छायाचित्रणाचे चीज झाले, असे वाटते. नाशिकच्या कुं भमेळ्याला जागतिक वारसा म्हणून घोषित करावे, हीच अपेक्षा आहे. - संजय जगताप, छायाचित्रकार