शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
3
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
4
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
5
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
6
पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक
7
चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!
8
Radhika Yadav : "भावाला बाहेर पाठवलं, पिटबुलला बांधलं अन् राधिकाला मारलं"; हिमांशिकाचा धक्कादायक खुलासा
9
पती-पत्नी वादात कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून ग्राह्य धरणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
11
“प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला, कडक कारवाई करावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
12
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
13
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
14
शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंगची थिअरी आणि समर्थ रामदास यांच्या स्तोत्रात आहे एक साम्य!
15
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
16
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था
17
२६ व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाईड नोट, समोर आलं मोठं कारण
18
रीलपायी जीव गमावला! १६ वर्षांचा मुलगा ट्रेनवर चढला, हाय पॉवर केबलला स्पर्श झाला अन्...
19
'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी
20
तुमच्या कुंडलीत आहे पंचमहापुरुष योग? धन-धान्य-वैभव, पैसा कमी पडत नाही; भरघोस भरभराट, शुभ-लाभ!

आपलं पॅनल’ला निर्विवाद बहुमत

By admin | Updated: November 18, 2015 22:42 IST

मनमाड : प्रगती अर्बन बॅँक निवडणूक; ‘नम्रता’चा धुव्वा‘

 मनमाड : शहराची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रगती अर्बन बॅँकेच्या निवडणुकीत आपलं पॅनलने सर्व १५ जागा जिंकून निर्विवाद बहुमत प्राप्त केले.प्रगती बॅँकेने गेल्या १९ वर्षात चौफेर आर्थिक प्रगती केली असून, पारदर्शक कारभारामुळे या बॅँकेचा नावलौकिक टिकून आहे. बॅँकेचे संस्थापक अध्यक्ष पन्नालाल शिंगी व सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेले आपलं पॅनलच्या विरोधात दादा बंब, रवींद्र घोडेस्वार यांच्या नेतृत्वाखालील नम्रता पॅनलने लढत दिली. छत्रे विद्यलयात झालेल्या या निवडणुकीची हिरूभाऊ गवळी मंगल कार्यालयात कडक पोलीस बंदोबस्तात मतमोजणी करण्यात आली. या चुरशीच्या निवडणुकीत आपलं पॅनलचे सर्वच्या सर्व १५ उमेदवार विजयी झाले. यात सर्वसाधारण गटातून पन्नालाल शिंगी (२०२०), कल्याणचंद ललवाणी (१९८१), हिरालाल सुराणा (१९३७), अशोक शिंगी (१८८५), संदीप ललवाणी (१८५०), मनोज बाफना (१८४७), संदीप कुलकर्णी (१८४१), सुनील भंडारी (१७९१), सुभाष संकलेचा (१७८७), विनोद दातार (१६८८), महिला राखीव गटात पुष्पा राका (१९७९), पुष्पा लोढा (१८८९), अनुसूचित जाती-जमाती गटात दत्तात्रय हादगे (१८६४), इतर मागास प्रवर्ग गटात पंढरीनाथ वरखेडे (२०३२), विमुक्त जाती गटात मनोज गवळी (२१४१) हे उमेदवार विजयी झाले. निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी आतषबाजी करून जल्लोष केला. विजयी उमेदवारांची शहरातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. निवडणुकीत सभासदांनी विद्यमान संचालक मंडळावर विश्वास व्यक्त केल्याचे निकालातून स्पष्ट झाल्याचे पन्नालाल शिंगी यांनी तर आपले पॅनलच्या उमेदवारांच्या निस्वार्थी कारभारामुळे विजयश्री प्राप्त झाल्ल्याचे ज्येष्ठ उद्योजक अजित सुराणा यांनी सांगितले. (वार्ताहर)