शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
9
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
10
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
11
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
12
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
13
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
14
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
15
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
16
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
17
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
18
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
19
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
20
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

वर्षाच्या आत भुयारी मार्गाची दुरवस्था

By admin | Updated: June 2, 2014 00:20 IST

नाशिक : द्वारका सर्कल येथे नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे नागरिकांना रस्ता ओलांडतानाचा धोका टाळता यावा म्हणून भुयारी मार्ग करण्यात आला आणि अवघ्या काही महिन्यांपूर्वी तो पादचार्‍यांसाठी खुलाही झाला; परंतु त्याची दुरवस्था झाली आहे. भुयारी मार्गावरील पथदीव्यांच्या संरक्षक जाळ्या तुटल्या असून, पत्रेही फुटले आहेत.

नाशिक : द्वारका सर्कल येथे नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे नागरिकांना रस्ता ओलांडतानाचा धोका टाळता यावा म्हणून भुयारी मार्ग करण्यात आला आणि अवघ्या काही महिन्यांपूर्वी तो पादचार्‍यांसाठी खुलाही झाला; परंतु त्याची दुरवस्था झाली आहे. भुयारी मार्गावरील पथदीव्यांच्या संरक्षक जाळ्या तुटल्या असून, पत्रेही फुटले आहेत.मंुबई-आग्रा महामार्गावर गरवारे पॉइंट ते आडगावपर्यंत उड्डाणपूल उभारण्यात आला आणि नाशिकच्या नावलौकिकात भरही पडली. तसेच उड्डाणपुलाखाली दोन्ही बाजूने शहरातील रहदारीसाठी चार लेनचे रस्ते आहेत, शिवाय समांतर रस्ताही असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली.दरम्यान, द्वारका सर्कल येथे चारपेक्षा अधिक रस्ते एकत्रित येतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या आहे; पण पादचार्‍यांनाही रस्ता ओलांडणे धोक्याचे असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याठिकाणी भुयारी मार्गाचे काम केले. त्यामुळे रस्ता ओलांडण्याचा धोका कमी होणार, असा कयास होता. प्रत्यक्षात नागरिकांचा सदरील भुयारी मार्गाला अत्यंत अल्पप्रतिसाद लाभला. मार्गाचा वापर होत नसल्याने टवाळखोरांकडून भुयारी मार्गातील पथदीव्यांचे नुकसान करण्यात आले आहे. दिव्यांच्या संरक्षक जाळ्या गायब झाल्या आहेत. जागोजागी कचरा साचलेला आहे तर गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या वादळी पावसाने पत्र्यांचेही नुकसान झाले असून, काही ठिकाणी पत्रे तुटले आहेत. अवघ्या काही महिन्यांत भुयारी मार्गाच्या झालेल्या दुरवस्थेमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यासंदर्भातील देखभाल दुरुस्ती न केल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे.