शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

डोंगर स्वच्छ करण्याचा उपक्रम

By admin | Updated: February 7, 2017 23:42 IST

त्र्यंबकेश्वर : तीन सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी ब्रह्मगिरीवर राबविली मोहीम

त्र्यंबकेश्वर : आयपीएल ग्रुप, नवशक्ती मित्रमंडळ व मनीषा भोयर स्मृती ट्रस्ट या तीन सेवाभावी संस्थांच्या तरुणाईने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या तरुणांनी यावेळेस नऊ दिवसांच्या आपल्या कार्यकाळात गंगाद्वार, ब्रह्मगिरी हे त्र्यंबकेश्वरमधील विस्तीर्ण पर्वत स्वच्छ करण्याचा जणू विडा उचलला आहे. एवढेच नव्हे तर परिक्रमा मार्ग देखील अस्वच्छ झाला होता. या मोहिमेत सुमारे ७ ते ८ ट्रॅक्टर कचरा जमा झाला होता. तर सहा तारखेपर्यंत कचरा गोळा करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्रात यात्रेकरू-पर्यटक यांची नियमित वर्दळ असते. निवृत्तिनाथ यात्रा, महाशिवरात्री, श्रावण महिना पूर्ण व एरवीदेखील सुटीच्या दिवशी यात्रेकरूंचा राबता असतो. यातील असंख्य यात्रेकरू गंगाद्वार-ब्रह्मगिरीवर गोदावरी उगमस्थान पहावयास येतात. तेथून त्र्यंबकेश्वर शहर व परिसराचे विलोभनीय दृश्य, निसर्ग सौंदर्य व धार्मिक स्थळे पाहण्यासाठी भाविक-पर्यटक गर्दी करतात.  जवळचे अन्नपदार्थ, फराळाचे पदार्थ, इतर खाऊ बरोबर आणतात. तर निवृत्तिनाथ यात्रा झाल्यावर असे टाकाऊ पदार्थ, प्लॅस्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, पत्रावळी, जेवणाच्या प्लॅस्टिक प्लेट्स आदि वस्तू बिनदिक्कत टाकून देतात. संपूर्ण डोंगर परिसरातील सपाटी व झाडीत जिकडे तिकडे पहावे तर अशा वस्तूंचा खच पडलेला असतो.  प्रदक्षिणा मार्गावरदेखील असा कचरा पडलेला असतो. सेवाभावी कार्यात अग्रेसर असलेला आयपीएल ग्रुप (प्लॅस्टिक बाटल्यांची होडी फेम) सेवाभावी व गरीब होतकरू मुलांना वह्या-पुस्तके आदि शालेय साहित्य वितरित करणारी मनीषा ट्रस्टची तरुणाई व नवशक्ती मित्रमंडळाचे सदा नवनवीन उपक्रम करणारे युवक मंडळ अशा तीन ग्रुपचे सुमारे १०० तरुण या अभिनव उपक्रमात कचरा उचलण्याचे काम करीत आहे. या कामासाठी लागणारे साहित्य, ट्रॅक्टर आदिंसाठी खर्च त्या त्या ग्रुपतर्फे करण्यात आला आहे.  या उपक्रमात ललित (गुरू) लोहगावकर, सचिन कदम, अ‍ॅड. पराग दीक्षित, श्यामराव गोसावी, श्याम गंगापुत्र, खंडू भोई, शैलेश गायकवाड, अमोल दोंदे, अमोल पगारे, दिनेश सोमवंशी, नाना खोडे, भगवान आचारी, हरिष झोले, योगेश भांगरे, रमेश झोले, प्रमोद आचारी, सतीश पवार, नितीन शिंदे, बाबूराव उगले, अनिल रोशन, विशाल, नितीन लोहगावकर आदिंचा या अनोख्या उपक्रमात सहभाग आहे. (वार्ताहर)