शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाखालील परिस्थिती ‘जैसे-थे’

By admin | Updated: September 9, 2016 01:16 IST

यंत्रणेची डोळेझाक : असुरक्षित संसार ‘हायवे’वरच

नाशिक : मुंबई नाका ते वडाळानाकादरम्यान महामार्गावर गजरा विक्रेत्यांची आठ ते दहा कुटुंबांचा संसार दुभाजकावरच कायम असून, याकडे यंत्रणेची डोळेझाक होत आहे. हायवेवरील असुरक्षित संसाराचा मुद्दा प्रकाशझोतात येऊनदेखील त्याबाबत महापालिका, पोलीस, महामार्ग प्राधिकरण अशा सर्वच जबाबदार यंत्रणेने डोळेझाक करणे पसंत केले आहे.शहरामधील विविध सिग्नलवर गजरे विक णारी लहान मुले, महिला, युवक यांचा रात्री व दिवसाही मुक्काम असतो तो मुंबईनाका परिसरातील उड्डाणपुलाखाली थेट महामार्गाच्या दुभाजकावरच. यामुळे या गजरा विक्रेत्यांच्या कुटुंबाची सुरक्षा धोक्यात आली आहे. विक्रेत्यांनी घरावर होणारा खर्च किंवा शहर व परिसरात झोपड्या टाकण्याची निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे निवाऱ्याचा ‘शॉर्टकट’ हायवेवर शोधला आहे. झोक्यात झोपणाऱ्या लहान बाळांपासून ते वृद्धांपर्यंत या विक्रेत्यांच्या कुटुंबात सदस्य आहेत; मात्र त्याचे कु ठलेही गांभीर्य विक्रेत्यांना नाही. दुभाजकावरच या विक्रेत्यांचा दिवस उगवतो आणि रात्रही सरते. महामार्गावरून भरधावपणे जाणाऱ्या वाहनांच्या आवाजात ही मंडळी बिनधास्तपणे ‘निद्रिस्त’ असते. रस्त्यालगतच्या पदपथांवर झोपणारे किंवा दुभाजकांवर झोपलेल्या भिखारींचा अपघातात मृत्यू झाल्याच्या घटना मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये यापूर्वी घडल्या आहेत. त्या घटनांची पुनरावृत्ती या ठिकाणीही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण दिवसा-रात्री वाहनचालक भरधावपणे महामार्गावरून वाहने नेतात. महामार्गाच्या दुभाजकांवर झोपणे हे धोकेदायक आहे. रात्रीच्या वेळी हा धोका कित्येकपटीने वाढतो; मात्र याची कुठलीही जाणीव या गजराविक्रेत्यांना नाही किंबहुना असूनही नसल्यासारखे हे लोक भासवत आहे. दुर्दैवाने काही अप्रिय घटना घडल्यास महापालिका, पोलीस, महामार्ग प्राधिकरण अशा सर्वच सरकारी शासकीय प्रशासनाच्या भूमिकेविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटतील यात शंका नाही. (प्रतिनिधी)