शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी सटाणा शहरात बेकायदा पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:33 IST

शहरातून जाणाºया विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर बेशिस्त पद्धतीने वाहने पार्किंग होत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये संताप व्यक्तरोज छोटे-मोठे अपघात होण्यास भर वाहनांना येण्या-जाण्यासाठी मोठी कसरत

सटाणा : शहरातून जाणाºया विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर बेशिस्त पद्धतीने वाहने पार्किंग होत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे रोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. वाहतूक पोलीस आणि नगरपालिका प्रशासन कुठलीही कार्यवाही करत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. नगरपालिकेने उपाययोजना करून व वाहतूक पोलिसांनी नियमित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील जिजामाता उद्यान ते पुष्पांजली थिएटरपर्यंत वाहतुकीचा मोठा बोजवारा उडतो. या मार्गावर दुचाकी व चारचाकी वाहनधारक बेशिस्तपणे आपली वाहने रस्त्याच्या बाजूला उभ्या करून आपल्या कामासाठी निघून जातात. परिणामी येणाºया व जाणाºया वाहनांची मोठी कोंडी होते. यामुळे रोज छोटे-मोठे अपघात होण्यास भर पडते. रस्त्यावर होणारी वाहनांची गर्दी आणि हातगाड्यांच्या सापळ्यात अडकणाºया पादचाºयांना चालणेही मुश्कील होते. या मार्गावर शासकीय कार्यालये, बस स्टॅण्ड, शाळा, महाविद्यालय, व्यापारी संकुल, छोटी- मोठे दुकाने, हॉटेल, बँक, पेट्रोल पंप आहेत. स्टेट बँकेत येणारे अनेक जण रस्त्यावरच वाहने पार्किंग करतात. बँकेत जाण्यासाठीही नागरिकांना कसरत करावी लागते. वाहने पार्किंगची सोय नसल्याने रस्त्यावरच आपली वाहने पार्किंग करतात. यातही शहर रिक्षा स्टॅण्ड, मालेगाव, देवळा, ताहाराबाद, वीरगाव, डांगसौंदाणे, कंधाणे, नामपूर या गावाला जाण्यासाठी या रस्त्यावरच काळी पिवळी टॅक्सी, रिक्षा स्टॅण्ड, माल वाहतूक रिक्षा स्टॅण्ड आहेत. टॅक्सीचालक व रिक्षाचालक प्रवाशांना रस्त्याच्या एका बाजूला न उतरविता रस्त्यावरच उतरविले जाते व आपले वाहनही बेशिस्तपणे पार्किंग करतात. बसस्थानक मोठा परिसर असल्याने अनेक नागरिक सुरक्षेच्या कारणाकरिता आपली दुचाकी व चार चाकी वाहने पार्किंग करून बाहेरगावी निघून जातात. हा रस्ताही अरूंद असल्याने मोठ्या वाहनांना येण्या-जाण्यासाठी मोठी कसरत होते. ही पार्किंगची समस्या बस स्टॅण्डसमोरील सुभाष रोड क्र . १, २, ३ व टीडीए रोडवरील महात्मा फुले पुतळ्याजवळ अनधिकृतपणे आपले चार चाकी वाहन पार्किंग करतात. येथेही वाहतुकीची कोंडी होते.