शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

अनियंत्रित झालेल्या कारने महाविद्यालयीन विद्यार्थ्यास चिरडले

By admin | Updated: March 21, 2017 00:39 IST

आडगाव नाक्यावरील घटना : महिला कारचालकावर गुन्हा

पंचवटी : भरधाव अल्टो कारच्या धडकेत एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि़२०) दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास आडगाव नाक्यावरील स्वामीनारायण शाळेजवळ घडली़ मयत विद्यार्थ्याचे नाव मनोज सुभाष बाविस्कर (१९, रा़ चव्हाण मळा, साईप्रेम हॉटेलशेजारी, तपोवन, नाशिक) तर जखमी विद्यार्थ्याचे नाव विशाल पालवे (रा़ चव्हाण मळा, तपोवन, नाशिक) असे आहे़ या अपघातप्रकरणी कारचालक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वामीनारायण मंदिराजवळील हॉटेल साईप्रेम रस्त्यावर मनोज बाविस्कर व विशाल पालवे हे दोघे आपल्या अ‍ॅक्टिवा दुचाकी (एमएच १५, ईएन ८३६२) जवळ उभे होते़ त्यावेळी भरधाव आलेल्या अल्टो कारने (एमएच १५, ईपी १३७७) या दोघांना जबर धडक दिली़ यामध्ये मनोज बाविस्कर हा रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या संरक्षक जाळीवर फेकला गेला़ संरक्षक जाळी मानेत घुसल्याने तसेच डोक्यावर आघात झाल्याने मनोज हा गंभीर जखमी झाला़ त्यास अशोक कापसे यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ़ गायकवाड यांनी तपासून मयत घोषित केले़ तर दुसरा जखमी पालवेवर उपचार सुरू आहेत़या अपघातात मृत झालेला मनोज बाविस्कर हा केटीएचएम महाविद्यालयात शिक्षण घेत असून बारावीचे पेपर देत होता़ त्याच्या पश्चात आई, वडील व दोन बहिणी असा परिवार आहे़ याप्रकरणी आडगाव पोलिसांनी अल्टो कारचालक महिला राजश्री राहुल महाजन (रा़ हिरावाडी, पंचवटी, नाशिक) विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे़ (वार्ताहर)