शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हिंसाचाराविरोधात अभाविपची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:51 IST

केरळमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याच्या हत्या तसेच हिंसाचाराविरोधात अभाविपच्या पदाधिकारी व सदस्यांनी मंगळवारी (दि़३१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली़ ‘सेव्ह केरला- सेव्ह डेमाक्रॉसी’, ‘वंदे मातरम्‘, ‘भारत माता की जय’च्या घोषणा देण्यात आल्या़ यानंतर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन देण्यात आले़

नाशिक : केरळमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याच्या हत्या तसेच हिंसाचाराविरोधात अभाविपच्या पदाधिकारी व सदस्यांनी मंगळवारी (दि़३१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली़ ‘सेव्ह केरला- सेव्ह डेमाक्रॉसी’, ‘वंदे मातरम्‘, ‘भारत माता की जय’च्या घोषणा देण्यात आल्या़ यानंतर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन देण्यात आले़केरळमध्ये अनेक वर्षांपासून संघ तसेच परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत असूनही केरळ सरकारकडून कारवाई केली जात नाही़ या हत्येला केरळ सरकारचा पाठिंबा असून, त्याविरोधात मंगळवारी हे आंदोलन करण्यात आले़ केरळमध्ये कम्युनिष्ट सरकारच्या २ वर्षांच्या कालावधीत १४ खून करण्यात आल्याचे महानगरमंत्री सागर शेलार यांनी सांगितले, तर केरळच्या क्रूर शासनाच्या राजवटीत महिला आणि तरुणांचे आयुष्य उद््ध्वस्त होत असल्याचे महानगर सहमंत्री शर्वरी अष्टपुत्रे यांनी सांगितले़  यावेळी महानगर सेवा आयामप्रमुख वैभव गुंजाळ, दुर्गेश केंगे, पवन प्रजापती, सुनील शिंदे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.केरळ सरकारच्या निषेधार्थ ११ नोव्हेंबर रोजी राजधानी तिरुवन्तंतपूरमध्ये महामोर्चा काढण्यात येणार आहे़ या मोर्चात देशभरातील लाखो अभाविपचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे महानगर सहमंत्री रूपेश पाटील यांनी सांगत लोकशाहीचा केरळमध्ये लोकशाहीचा गळा आवळण्यात येत असल्याचा आरोप केला़