शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

अविश्वास बारगळला अन् विवाहही झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:50 IST

इगतपुरी : तालुक्यातील कुर्णोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच विलास जोशी यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळला आहे. विशेष म्हणजे अविश्वास ठरावाच्या सभेच्या दिवशीच (सोमवार दि़१२) उपसरपंच विलास जोशी यांचा विवाह असल्याने लग्न की सभा असा तांत्रिक पेच उपस्थित झाला होता.

ठळक मुद्देविवाह असल्याने लग्न की सभा असा तांत्रिक पेच उपस्थित झाला कोणीही उपस्थित नसल्याने हा ठराव बारगळला़

कुर्णोलीचे उपसरपंच विलास जोशी यांच्या लग्नातील क्षण .

इगतपुरी : तालुक्यातील कुर्णोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच विलास जोशी यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळला आहे. विशेष म्हणजे अविश्वास ठरावाच्या सभेच्या दिवशीच (सोमवार दि़१२) उपसरपंच विलास जोशी यांचा विवाह असल्याने लग्न की सभा असा तांत्रिक पेच उपस्थित झाला होता.जोशी यांच्या विरूद्ध सरपंचांसह ३ ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदारांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यावर अविश्वास ठरावावरील विशेष सभा झाली. मात्र अविश्वास ठराव दाखल करणाºयांसह स्वत: उपसरपंच अनुपस्थित राहिल्याने ठराव बारगळला.इगतपुरीचे तहसीलदार अनिल पुरे यांनी अविश्वास ठराव बारगळल्याचे घोषित केले. आता एक वर्षभर अविश्वास ठराव आणता येणार नसल्याने उपसरपंच विलास जोशी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इगतपुरी तालुक्यातील कुर्णोली येथील उपसरपंच विलास जोशी यांच्या विरोधात सरपंच वेणूबाई तेलम, ग्रामपंचायत सदस्य वाळू तेलम, कुसुम गटखळ, संगीता जोशी यांनी इगतपुरीचे तहसीलदार अनिल पुरे यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. तहसीलदारांनी या ठरावावर चर्चा करण्यासाठी सोमवारी (दि़१२) सभेचे आयोजन केले होते़ मात्र संबंधित कोणीही उपस्थित नसल्याने हा ठराव बारगळला़ यावेळी तहसील कार्यालयातील राजकुमार भालेराव, तलाठी सुनील शिवपुजे उपस्थित होते. उपसरपंच विलास जोशी यांचे सभेच्या दिवशीच लग्न असल्याने कुर्णोली येथे विवाहसोहळाही थाटामाटात संपन्न झाला.