शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील दहा शाळा अनधिकृत

By admin | Updated: June 14, 2017 00:03 IST

यादी जाहीर : मराठासह क्रांतिवीर नाईक शिक्षण संस्थेच्या शाळांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील दहा अनधिकृत शाळांची यादी मंगळवारी (दि.१३) जाहीर केली असून, या शाळा बंद करण्याच्या नोटिसा संबंधित शाळा व्यवस्थापनाला बजावण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने शासन नियम-निकषांचे पालन न करणाऱ्या व अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या दहा शाळांची यादी जाहीर केली असून, या शाळांमध्ये पालकांनी त्यांच्या पाल्यांचे प्रवेश न घेण्याचे आवाहन केले आहे. प्रवेश घेतल्यास होणाऱ्या नुकसानीस जबाबदार राहणार नसल्याचेही माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या दहा अनधिकृत शाळांच्या यादीत मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सहा, क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेची एक, सद्भावना बहुद्देशीय संस्था नागपूर व धुळे येथील दोन विविध शैक्षणिक संस्थांच्या शाळांचा समावेश आहे. अनधिकृत शाळा - स्व. गोपीनाथ मुंडेसाहेब अनुदानित आदिवासी आश्रमशाळा सादडवाडा, पेठ (८ वी ते १० वी वर्ग), मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेची जनता विद्यालय खडकजांब (८ वी ते १० वी वर्ग), जनता विद्यालय वडबारे, जनता विद्यालय अंगणगाव (५ वी ते ७ वी वर्ग), जनता विद्यालय गवंडगाव (५ वी ते ७ वी वर्ग), जनता विद्यालय आडगाव रेपाळ,(८ वी ते १० वी वर्ग), जनता विद्यालय पिंपळगाव जलाल (८ वी ते १० वी वर्ग), व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेची माध्यमिक विद्यालय निमगाव (८ वी ते १० वी वर्ग), तापी परिसर मंडळाचे शिक्षण प्रसारक माळीज संस्थेचे माध्यमिक विद्यालय कंक्राळे (८ वी ते १० वी वर्ग), शिवमहाराष्ट्र शिक्षण संस्था ककाणीची पूज्य अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय क्रंकाळे (८ वी ते १० वी वर्ग) या दहा शाळांचा अनधिकृत शाळांच्या यादीत समावेश आहे.