शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बसथांब्यावर खासगी मोटारींचा अनधिकृत थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:13 IST

नवविकसित भागातील वाढत्या समस्यांची झळ सामान्य नागरिकांना लागत आहे. वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सार्थकनगर बसथांब्यासमोरच पालकवर्ग आणि विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनधारकांची वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने रस्त्यावर तासन्तास वाहतुकीची कोंडी होते. परंतु त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे बस आणि अन्य वाहनांमुळे एखाद्या विद्यार्थ्याच्या जिवावर बेतू शकते.

संजय शहाणे ।इंदिरानगर : नवविकसित भागातील वाढत्या समस्यांची झळ सामान्य नागरिकांना लागत आहे. वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सार्थकनगर बसथांब्यासमोरच पालकवर्ग आणि विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनधारकांची वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने रस्त्यावर तासन्तास वाहतुकीची कोंडी होते. परंतु त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे बस आणि अन्य वाहनांमुळे एखाद्या विद्यार्थ्याच्या जिवावर बेतू शकते. पंचवटी येथील सेवाकुंज येथे झालेल्या अपघातात अशाच प्रकारे एका बालकाचा मृत्यू झाला होता. अशा दुर्घटनेच्या पुनरावृत्ती होण्याची वाट तर वाहतूक पोलीस बघत नाही ना, असा भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.वडाळा-पाथर्डी रस्त्यालगतच इंदिरानगर, कलानगर, सार्थकनगर, रामनगर, सदिच्छानगर, पांडवनगरी, सराफनगर यांसह विविध उपनगरे आहेत. बहुतेक नागरिक वडाळा-पाथर्डी रस्त्याचा वापर करतात. अंबड औद्योगिक वसाहत व देवळाली कॅम्पला हा जवळचा रस्ता असल्याने दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. नागपूरच्या धर्तीवर म्हणजे एज टू एज रस्ता रुंदीकरणाचे काम झाल्याने वाहतूक सुरळीत होईल, असे सांगितले जात होते. परंतु येथे घडले भलतेच, रुंद रस्त्यामुळे बेदरकारपणे रस्त्यावर धावणारी वाहने तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असणाºया मोटारींमुळे वेगळीच धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.सार्थकनगर बसथांब्यासमोरच एक प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय आहे. त्याठिकाणी सकाळी ८ वाजता, सकाळी ११च्या सुमारास आणि दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी येणाºया पालकांची दुचाकी आणि चारचाकी वाहने सर्रास रस्त्यावरच लावली जातात. त्यामुळे दिवसभरातून तीन ते चार वेळेस वाहतुकीस रस्ता जणू काही बंदच होतो.  या कालावधीत मार्गक्रमण करणाºया अन्य वाहनधारक आणि पादचाºयांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते. लाखो रुपये खर्च करून तयार केलेला हा रस्ता वाहतुकीसाठी आहे की वाहनतळासाठी असा प्रश्न संतप्त नागरिक करू लागले आहेत. या विद्यार्थी वाहतूक करणाºयांच्या वाहनांमुळे लगतच असलेल्या अपार्टमेंट व सोसायटीतील रहिवाशांना बाहेर जाणेसुद्धा मुश्कील झाले आहे. तातडीने वाहतुकीस रस्ता मोकळा करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. (क्रमश:)