शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांची दिवाळी अंधारात

By admin | Updated: October 24, 2015 22:38 IST

विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांची दिवाळी अंधारात

दहिवड : राज्य शासनाकडून सर्व राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना वेतनाच्या ६ टक्के महागाई भत्ता देण्याचे दिवाळीच्या पर्वावर जाहीर केले; मात्र दुसरीकडे गत १५ वर्षांपासून विनावेतन विद्यादानाचे कार्य करणाऱ्या विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांवर अनुदानअभावी आपली दिवाळी याहीवर्षी अंधारात साजरी करण्याची वेळ आली आहे.२००१ पासून कायम विनाअनुदानित तत्त्वावर ह्या अनेक शाळा उघडण्यात आल्या. यातील ‘कायम’ हा शब्द २००९ मध्ये वगळण्यात येऊन ‘विनाअनुदानित’ नावाने आता ह्या शाळा सुरू आहेत. त्यानंतर २०११-१२ मध्ये या शाळांची मृय्यांकन प्रक्रिया पूर्ण झाली व वेळोवेळी शासनाने वेगवेगळ्या तारखेला साधारण १३४३ शाळा अनुदानास पात्र ठरविल्या; मात्र शासनाने कधी त्रयस्थ समिती, कधी आधारकार्ड सक्ती अशा अडचणी शाळांसमोर उभ्या केल्या. त्या पूर्ण करणेसाठी शाळांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ह्यासर्व अटी शर्ती पूर्ण करुन देखील अशा शाळांना अनुदान निधी शासनस्तरावर मंजूर होऊ शकले नाही. परिणामी अशा शाळांमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांच्या वतीने स्वत:चा विचार न करता भावी पिढी घडविण्याचे काम सदैव चालू आहे. मात्र त्यांच्या ह्या कार्याची दखल शासन घेत नाही. कायम विनाअनुदानित कृती समितीकडून आत्तापर्यंत अनेक आंदोलने झालीत; मात्र शासनस्तरावर काहीच तोडगा निघत नाही. या शिक्षकांच्या कुटुंबांना उपासमारीची वेळ आली आहे. अवघ्या काह दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला असून राज्य शासनाकडून कर्मचाऱ्यांना ६ टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा केली. मात्र १५ वर्षापासून दारिद्र्याचे चटके सहन करीत अध्ययन करणाऱ्या शिक्षकांच्या व्यथा शासनाला दिसत नाही का, असा सवाल विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांकडून केला जात आहे. (वार्ताहर)