नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत निफाड परिसरातून मद्याचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळगाव बसवंत -निफाड रस्त्यावरील लोणवाडी शिवारात मद्याच्या अवैध साठ्याची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कळवण विभागाला मिळाली. त्यानुसार सापळा रचण्यात येऊन ही कारवाई करण्यात आली. शनिवार दि. २५ रोजी रात्री ११ वाजता करण्यात आलेल्या या कारवाईत ३ लाख २ हजार २४० रूपये किमतीचा मद्याचा अवैध साठा जप्त करण्यात आला. वाहन (क्र. एमएच १८ डी ७७७१) मधून मद्याचा अवैध साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी गणेश नारायण निकम, महेश सुरेश वाणी, राजेंद्र भटू चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ७६८ बाटल्या मद्याचा अवैध साठा जप्त करण्यात आला. दुय्यम निरिक्षक प्रकाश अहिरराव, पी. बी. अहिरराव यांंनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)
निफाडलगत मद्याचा अवैध साठा जप्त
By admin | Updated: February 27, 2017 00:54 IST