शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

तळमजल्यासह टेरेसवरील अनधिकृत बांधकामांचा सर्व्हे

By admin | Updated: June 25, 2017 00:35 IST

नाशिक : शहरात इमारतींच्या तळमजल्यासह टेरेसवरील अनधिकृत बांधकामांचा सर्व्हे करण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी स्थायीच्या सभेत नगररचना विभागाला दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरात इमारतींच्या तळमजल्यासह टेरेसवरील अनधिकृत बांधकामांचा सर्व्हे करण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी स्थायीच्या सभेत नगररचना विभागाला दिले आहेत. येत्या दीड महिन्यात त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्याही सूचना यावेळी देण्यात आल्या.  स्थायी समितीची सभा शिवाजी गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सभापतींनी शहरातील इमारतींमधील बेसमेंट आणि टेरेस यांचा अनधिकृत वापर होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. सदर ठिकाणी अनधिकृत बांधकामे करत व्यावसायिक वापर होत असल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे सदर अनधिकृत बांधकामांचा सर्व्हे करण्याचे आदेश सभापतींनी नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण यांना दिले.  तसेच येत्या दीड महिन्यात त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. दरम्यान, पी. बी. चव्हाण यांनी याबाबतचा असा सर्व्हे अद्याप केला नसल्याचे सांगत नगररचना विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले. परंतु, सभापतींनी त्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी देत सदर सर्व्हेचा अहवाल स्थायीला सादर करण्याच्या सूचना दिल्या.दरम्यान, सभेत अशोका मार्ग येथील ३० मीटर रुंद विकास योजना रस्त्याच्या भूसंपादनाकरिता ५१ लाख ६३ हजार रुपये उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्यास मान्यता देण्यात आली तर मानधनावरील कर्मचारी नियुक्तीचे प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आले. एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण समिती (अंब्रेला सोसायटी)च्या प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या ३६ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मानधनावरील मुदतवाढीचा प्रस्तावही तहकूब ठेवण्यात आला.