शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत साहसी पर्यटनाच्या आयोजनाला दणका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:19 IST

नाशिक : राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने राज्याच्या साहसी पर्यटन उपक्रम धाेरणास मान्यता देण्यात आली आहे. ...

नाशिक : राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने राज्याच्या साहसी पर्यटन उपक्रम धाेरणास मान्यता देण्यात आली आहे. या नवीन धोरणानुसार साहसी पर्यटनासाठी करण्यात आलेली नियमावली सर्व संबंधित संस्था, व्यक्ती आणि व्यक्तीसमूहाला आणि आयोजकांना लागू करण्यात आल्या आहेत. अधिकृतपणे साहसी पर्यटनाचे आयोजन करूनही अपघात झाल्यास संबंधिताविरुद्ध चौकशीअंती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अनधिकृत साहसी पर्यटन आयोजन केले जात असल्याचे निदर्शनास आल्यास थेट पोलिसी कारवाई होणार असल्याचा इशाराच या नवीन धोरणाव्दारे देण्यात आला आहे.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या नवीन धोरणात साहसी पर्यटनासाठी अनेक बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. त्यात साहसी पर्यटन हे एखाद्या धार्मिक, राजकीय, सामाजिक किंवा अन्य वाद असल्यास त्यासाठी पोलिसांचे ना हरकत तर सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने साहसी पर्यटन उपक्रमासाठी संबंधित विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच साहसी पर्यटनात १८ वर्ष आतील बालकांचा समावेश असल्यास त्यांच्या पालकांचे ना हरकत प्रमाणपत्र, लेखी परवानगी आवश्यक करण्यात आली आहे. त्या साहसी पर्यटनातील धोक्याची, त्रासाची माहिती संबंधित पर्यटकास टेक्स्ट मेसेजव्दारे, ऑनलाइन माहिती देणे आयोजकासाठी बंधनकारक आहे. तसेच संबंधित आयोजकांनी साहसी पर्यटन उपक्रमाच्या स्थानावर मार्गदर्शक नेमण्यासह फिरते पथक नेमणेदेखील बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय विशिष्ट निश्चितस्थळी साहसी पर्यटन करणाऱ्या आयोजकांनी दिशादर्शक नकाशे, सूचनाफलक, टेहळणी मनोरे, बचावासाठीच्या सुरक्षा उपाययोजना करणे आवश्यक असून अपूर्ण, अर्धवट, कमी दर्जाच्या सुरक्षा उपाययोजना, साहित्य आढळल्यास संबंधित आयोजकावर कारवाई करण्यात येईल.

इन्फो

थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

साहसी पर्यटन उपक्रम राबविताना अपघात झाल्यास उपक्रमाच्या आयोजकाला पूर्णपणे जबाबदार धरण्यात येणार आहे. तसेच शासनाने घालून दिलेल्या नियम आणि अटींचे पालन न करता साहसी पर्यटन केल्यानंतर कुणाच्या जिवाला धोका झाल्यास थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हादेखील दाखल करण्यात येणार आहे.