शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

उमराणे बाजार समितीत दहा कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 01:07 IST

उमराणे : होळी तसेच मार्च एंडमुळे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार साप्ताहिक सुट्टी वगळता पाच दिवस बंद ठेवण्यात आले होते. या काळात बाजार समितीअंतर्गत करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून, बाजार समितीचे सात ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.

ठळक मुद्देतब्बल नऊ दिवस बाजार समितीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

उमराणे : होळी तसेच मार्च एंडमुळे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार साप्ताहिक सुट्टी वगळता पाच दिवस बंद ठेवण्यात आले होते. या काळात बाजार समितीअंतर्गत करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून, बाजार समितीचे सात ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.रोखीचा अर्थव्यवहार, उत्तम दर्जाचा बाजारभाव, कांदा खरेदीदार व्यापाऱ्यांची अधिक संख्या, इलेक्ट्रॉनिक भुईकाटे, आदी कारणांमुळे कांदा आवकेचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्‍या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला होळी, धूलिवंदन व गुड फ्रायडे तसेच मार्च एंड व साप्ताहिक सुट्टींमुळे गेल्या २७ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत असे तब्बल नऊ दिवस बाजार समितीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. मात्र, साप्ताहिक सुट्ट्या वगळता बाजार समितीचे व्यवहार खऱ्या अर्थाने पाच दिवसच बंद होते; परंतु येथील बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असल्याने कांदा खरेदी विक्रीच्या माध्यमातून दररोज दोन कोटी रुपयांची उलाढाल होते. त्या अनुषंगाने पाच दिवसांच्या सुट्टीदरम्यान सुमारे नऊ ते दहा करोड रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. शिवाय मार्च एंडचा फटका बाजार समितीलाही बसला असून, दररोजचे एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न बघता सात ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. दरम्यान, नऊ दिवसांच्या बंदमुळे व्यापाऱ्यांच्या खळ्यांवर गोण्या भरणार्‍या मजुरांसह हमाली कामगार, माल वाहतूकदार, हॉटेल व्यावसायिक, हार्डवेअर विक्रेते, आदी बाजार समितीवर अवलंबून असणार्‍या व्यवसायधारकांवर परिणाम झाला आहे.मार्च एंडमुळे गेल्या आठ दिवसांपासून बाजार समितीचे कामकाज बंद असल्याने शेतात काढून ठेवलेल्या लाल व उन्हाळी कांद्याचे विक्रीअभावी हाल झाले आहेत. लिलाव पूर्ववत झाल्यानंतर कांदा विक्रीसाठी एकच गर्दी होण्याची शक्यता असल्याने बाजारभावात घसरण होण्याची भीती निर्माण झाली आहे.- किशोर जाधव, शेतकरी, उमराणेसद्य:स्थितीत गेल्या आठ दिवसांपासून बाजार समिती बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे माल विक्रीबाबत मोठे नुकसान झाले. बंदमुळे बाजार समितीअंतर्गत करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. मात्र, मार्च एंडमुळे व्यापारी वर्गाचेही कामकाज पूर्ण होणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही शेतकरी हित लक्षात घेऊन सोमवार, दि. ५ पासून लिलाव पूर्ववत सुरू करण्यात येणार आहेत.- सोनाली देवरे, मुख्य प्रशासक, उमराणे बाजार समिती

उमराणे बाजार समितीत दहा कोटींची उलाढाल ठप्पउमराणे : होळी तसेच मार्च एंडमुळे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार साप्ताहिक सुट्टी वगळता पाच दिवस बंद ठेवण्यात आले होते. या काळात बाजार समितीअंतर्गत करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून, बाजार समितीचे सात ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.रोखीचा अर्थव्यवहार, उत्तम दर्जाचा बाजारभाव, कांदा खरेदीदार व्यापाऱ्यांची अधिक संख्या, इलेक्ट्रॉनिक भुईकाटे, आदी कारणांमुळे कांदा आवकेचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्‍या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला होळी, धूलिवंदन व गुड फ्रायडे तसेच मार्च एंड व साप्ताहिक सुट्टींमुळे गेल्या २७ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत असे तब्बल नऊ दिवस बाजार समितीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. मात्र, साप्ताहिक सुट्ट्या वगळता बाजार समितीचे व्यवहार खऱ्या अर्थाने पाच दिवसच बंद होते; परंतु येथील बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असल्याने कांदा खरेदी विक्रीच्या माध्यमातून दररोज दोन कोटी रुपयांची उलाढाल होते. त्या अनुषंगाने पाच दिवसांच्या सुट्टीदरम्यान सुमारे नऊ ते दहा करोड रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. शिवाय मार्च एंडचा फटका बाजार समितीलाही बसला असून, दररोजचे एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न बघता सात ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. दरम्यान, नऊ दिवसांच्या बंदमुळे व्यापाऱ्यांच्या खळ्यांवर गोण्या भरणार्‍या मजुरांसह हमाली कामगार, माल वाहतूकदार, हॉटेल व्यावसायिक, हार्डवेअर विक्रेते, आदी बाजार समितीवर अवलंबून असणार्‍या व्यवसायधारकांवर परिणाम झाला आहे.मार्च एंडमुळे गेल्या आठ दिवसांपासून बाजार समितीचे कामकाज बंद असल्याने शेतात काढून ठेवलेल्या लाल व उन्हाळी कांद्याचे विक्रीअभावी हाल झाले आहेत. लिलाव पूर्ववत झाल्यानंतर कांदा विक्रीसाठी एकच गर्दी होण्याची शक्यता असल्याने बाजारभावात घसरण होण्याची भीती निर्माण झाली आहे.- किशोर जाधव, शेतकरी, उमराणेसद्य:स्थितीत गेल्या आठ दिवसांपासून बाजार समिती बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे माल विक्रीबाबत मोठे नुकसान झाले. बंदमुळे बाजार समितीअंतर्गत करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. मात्र, मार्च एंडमुळे व्यापारी वर्गाचेही कामकाज पूर्ण होणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही शेतकरी हित लक्षात घेऊन सोमवार, दि. ५ पासून लिलाव पूर्ववत सुरू करण्यात येणार आहेत.- सोनाली देवरे, मुख्य प्रशासक, उमराणे बाजार समिती

टॅग्स :Marketबाजारonionकांदा