उमराणे : आजमितीस येथील बाजार समितीमधील ठराविक व्यापाºयांकडे शेतकºयांचे १ कोटी २८ लाख देणे बाकी आहे. या व्यापाºयांना ३० मेच्या आत शेतकºयांचे पैसे चुकते करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या असून, पैसे न दिल्यास जिल्हा उपनिबंधकांच्या परवानगीने स्थापन करण्यात आलेल्या न्यायाधिकरण समितीकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच १ जूनपासून बॅँकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उपलब्ध झाल्यास मालविक्र ीचे पैसे रोखीने देण्यात येणार असून, अडचण आल्यास आरटीजीएस व एनएफटीद्वारे चोवीस तासाच्या आत संबंधित शेतकºयाच्या बॅँक खात्यावर पैसे वर्ग करण्यात येणार आहेत. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक मंडळ, व्यापारी असोसिएशन व शेतकरी बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक होऊन त्यात निर्णय घेण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून उमराणे बाजार समितीत शेतमाल विक्रीचे पैसे धनादेशद्वारे देण्यात येत होते. परंतु बहुतांश व्यापाºयांकडील धनादेश बाऊन्स होत असल्याने व इतर कारणांमुळे शेतकºयांचे १३ कोटी रुपये थकले होते. बाजार समितीने वारंवार संबंधित व्यापाºयाकडे तगादा लावून शेतकºयांचे ११ कोटी ७२ लाख रु पये टप्प्याटप्प्याने चुकते करण्यास भाग पाडले. बैठकीस देवळा तालुका सहाय्यक निबंधक संजय गिते, बाजार समितीचे सभापती राजेंद्र देवरे, उपसभापती महेंद्र पाटील, संचालक मंडळ, व्यापारी असोसिएशनसचे अध्यक्ष खंडू पंडित देवरे व व्यापारी तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.
उमराणे बाजार समिती : पुढील महिन्यापासून रोखीने पेमेंट करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांकडे शेतकºयांची १ कोटींची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:24 IST