शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

उमदेवार ‘शहेंशाह-ए-नासिक’च्या दरबारात

By admin | Updated: February 18, 2017 17:51 IST

महापालिका निवडणुकीत सर्वच राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारदेखील निवडून येण्यासाठी सर्वस्व पणाला लावत आहे.

नाशिक : महापालिका निवडणुकीत सर्वच राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारदेखील निवडून येण्यासाठी सर्वस्व पणाला लावत आहे. जुने नाशिक परिसरातील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान व ‘शहेंशाहे नाशिक’म्हणून प्रसिद्ध असलेले सुफी संत हजरत सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या दरबारात सर्वच उमेदवारांनी हजेरी लावून ‘दुवा’ मागितली.निवडणुकीत विजय मिळावा, यासाठी निवडणूक रिंगणातील उमेदवारांकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, मतदरांच्या घरोघरी पोहचण्याबरोबरच विविध मंदिरांमध्ये तसेच दर्गाहमध्येदेखील उमेदवारांकडून हजेरी लावली जात आहे. शुक्रवारचे (जुमा) औचित्य साधत दुपारी नमाजपठणानंतर जुने नाशिक परिसरातील प्रभाग क्रमांक १३ व १४मधील विविध पक्षांचे व अपक्ष म्हणून निवडणूक लढवित असलेले उमेदवार हुसेनी बाबा यांच्या बडी दर्गामध्ये पोहचले होते. यावेळी उमेदवारांनी बाबांच्या मजारवर पुष्प अर्पण करून निवडणुकीत विजय प्राप्त व्हावा, यासाठी दुवा मागितली.दुपारी अचानकपणे आपापल्या पक्षांच्या मफलरी गळ्यामध्ये घालून टोक्यावर गोल टोपी परिधान करत सर्वच उमेदवार बडी दर्गाच्या प्रांगणात आल्याने नागरिकांचे आकर्षण ठरले. या उमेदवारांचे राजकीय व्यासपीठ जरी वेगवेगळे असले तरी निवडणुकीच्या निमित्ताने का होईना, सर्व उमेदवार बडी दर्गामध्ये एकत्र आल्याचे चित्र पहावयास मिळाले.