शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

अखेर मोजणीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:28 IST

सिन्नर : प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध असणाऱ्या शिवडे व घोरवड शिवारात बुधवारपासून (दि. ९) संयुक्त मोजणीस प्रारंभ झाल्याची माहिती तहसीलदार नितीन गवळी यांनी दिली. तथापि, शिवडे गावातील काही शेतकºयांचा या मोजणीला विरोध असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देसमृद्धी महामार्ग : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर शिवडे येथे सापडला मुहूर्त..शेतकºयांनी संमती दर्शविल्यानंतर शिवडे शिवारात मोजणीला प्रारंभ

सिन्नर : प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध असणाऱ्या शिवडे व घोरवड शिवारात बुधवारपासून (दि. ९) संयुक्त मोजणीस प्रारंभ झाल्याची माहिती तहसीलदार नितीन गवळी यांनी दिली. तथापि, शिवडे गावातील काही शेतकºयांचा या मोजणीला विरोध असल्याचे दिसून आले.समृद्धी महामार्गाविरोधात जोरदार लढा उभारणाºया सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे वर्षभरापूर्वी मोजणीस आलेल्या अधिकाºयांना परत लावण्यासह हिंसक वळण प्राप्त झाले होते. तेव्हापासून शिवडे येथे समृद्धीविरोधी वातावरणात धगधग सुरूहोती. शिवडे व घोरवड परिसरात बागायती जमिनी असल्याने या शेतकºयांना या प्रस्तावित महामार्गाला विरोध केला होता. बागायती जमिनी वगळून महामार्ग अन्य भागातून नेण्याची मागणी येथील शेतकºयांनी केली होती. समृद्धी महामार्गाला विरोध नोंदविण्यासाठी शेतकºयांनी मोजणीच्या वेळी रस्त्यावर टायर पेटवून देणे, शेतात सरण रचणे, रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणे, झाडाला गळफास टांगणे आदी आंदोलने केली होती. राष्टÑवादी कॉँग्रेसची संघर्ष यात्राही शिवडेत आल्याने शासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढल्याने या समृद्धीविरोधी आंदोलनास आणखी बळ मिळाले होते.बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, तहसीलदार नितीन गवळी, मीनाक्षी राठोड यांच्यासह कृषी, महाराष्टÑ जीवन प्राधिकरण, बांधकाम, महसूल, पाटबंधारे यांच्यासह कर्मचाºयांचा ताफा पोलीस निरीक्षक मुकुंददेशमुख यांच्यासह शिवडे घाटात दाखल झाला.सकाळी ११ वाजेच्या सुमारास शिवडे-सोनांबे घाटात मोजणीस प्रारंभ करण्यात आला. काही शेतकºयांच्या गटाची मोजणी केल्यानंतर वनविभागाच्या हद्दीतील मोजणी करण्यात आली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे १ किलोमीटर अंतराची मोजणी झाली होती. मोजणीसाठी अधिकारी शिवडे गावाजवळ गेल्यानंतर मोजणीला विरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. दरम्यान, काही शेतकºयांनी मोजणीला अधिकारी येणार असल्याने स्वत:च्या शेतात पाला-पाचोळा पेटवून मोजणीविरोधी इरादे स्पष्ट केले होते. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासह १० पोलीस कर्मचारी मोजणीच्या बंदोबस्तासाठी तैनात होते. या मोजणीकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.तहसीलमध्ये अधिकाºयांची बैठकसमृद्धी महामार्गाचा विरोध कमी करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात होते. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातही बैठका झाल्या होत्या. त्यानंतर शेतकºयांना जमिनी देताना शासनापुढे काही अटी व शर्थी ठेवल्या होत्या. सदर प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतरच्या काळात काही शेतकºयांचा विरोध मावळल्याचे चित्र होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सिन्नर तहसील कार्यालयात संबंधित अधिकाºयांची बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी सकाळपासून संयुक्त मोजणी व मूल्यांकनास प्रारंभ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शेतकºयांनी संमती दर्शविल्यानंतर शिवडे शिवारात मोजणीला प्रारंभ करण्यात आला. सुमारे ८०० मीटरची मोजणी करण्यात आली. त्यात कोणाचाही विरोध झाला नाही. ज्या ठिकाणी मोजणीला विरोध होईल तेथील मोजणी सोडून पुढील मोजणी करण्यात येणार आहे.- नितीन गवळी, तहसीलदार, सिन्नर