शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ समर्थकांच्या राज भेटीने उद्धव नाराज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 14:46 IST

महाराष्टÑ सदन बांधकाम घोटाळा व बेनामी संपत्ती प्रकरणावरून माजीमंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सध्या तुरूंगात असून, त्यांच्याविरूद्ध अंमलबजावणी संचालनालय कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला आहे. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यातील कलम ४५ रद्द ठरविल्यामुळे भुजबळ यांना जामीन मिळावा म्हणून केलेला अर्ज विशेष न्यायालयाने मध्यंतरी रद्द केला.

ठळक मुद्देवेळ देण्यास टाळाटाळ : खडसेंच्या भेटीनेही भर भुजबळ यांना ‘क्लिनचिट’ देणारे पत्र देणा-या शिवसेनेला टाळले

नाशिक : महाराष्टÑ सदन बांधकाम प्रकरणी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचा काहीएक दोष नसल्याचे सांगत भुजबळ यांना ‘क्लिनचिट’ देणारे पत्र देणा-या शिवसेनेला टाळून भुजबळ समर्थकांनी महाराष्टÑ नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने शिवसेनेत अस्वस्थता व तितकाच संताप व्यक्त केला जात असून, त्यामुळेच भुजबळ समर्थकांनी ‘अन्याय पे चर्चा’ करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मागितलेली वेळ देण्यास टाळटाळ केली जात असल्याचे चर्चा होऊ लागली आहे.महाराष्टÑ सदन बांधकाम घोटाळा व बेनामी संपत्ती प्रकरणावरून माजीमंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सध्या तुरूंगात असून, त्यांच्याविरूद्ध अंमलबजावणी संचालनालय कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला आहे. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यातील कलम ४५ रद्द ठरविल्यामुळे भुजबळ यांना जामीन मिळावा म्हणून केलेला अर्ज विशेष न्यायालयाने मध्यंतरी रद्द केला. भुजबळ यांच्याविरोधात सुडबुद्धीने कारवाई केली जात असल्याची तक्रार भुजबळ समर्थक करीत असल्याने त्यांनी ‘अन्याय पे चर्चा’ हा उपक्रम हाती घेत एक प्रकारे सरकार व न्यायालय दोघांनाही आरोपीच्या पिंजºयात उभे केले आहे. दोन दिवसांपुर्वीच भुजबळ समर्थकांनी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेवून भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली. ठाकरे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून ऐनवेळी भुमिका जाहीर करण्याचे आश्वासन देतानाच भुजबळ समर्थकांना खडे बोल सुनावले हा भाग अलहिदा. परंतु ज्या भुजबळांवर नाशिक महापालिका व विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी प्रछन्न आरोप करून राळ उठवून दिली होती त्या राज ठाकरे यांच्या दरबारात भुजबळ यांच्यासाठी समर्थकांनी हजेरी लावण्याची बाब शिवसेनेला खटकली आहे. मुळात राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाराष्टÑ सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी भाजपाने छगन भुजबळ यांना घेरण्यास सुरूवात केल्यानंतर सर्वात अगोदर शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी महाराष्टÑाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महाराष्टÑ सदन बांधकामाचा विषय मंत्रीमंडळ उपसमितीने घेतला असून, त्यात एकट्या भुजबळ यांचा दोष नसल्याचे सांगत भुजबळ यांना क्लिचिट दिली होती व भुजबळ यांची चौकशी करायची असेल तर संपुर्ण उपसमितीचीही चौकशी करावी लागेल, त्यामुळे भुजबळ यांना न्याय द्यावा अशी विनंती पत्रात केली होती.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक