शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पळसन येथे आदिवासींचे उलगुलान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 16:22 IST

सुरगाणा : तालुक्यातील पळसन येथे युवकांनी संघटन करून आदिवासींच्या समस्या सोडविण्या करीता उलगुलान पुकारले आहे. यावेळी आद्य क्र ांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

ठळक मुद्देयाप्रसंगी पार पडलेल्या बैठकीत आदिवासींना दैनंदिन जीवन जगतांना भेडसावणा-या अनेक गंभीर समस्यावर चर्चा करण्यात आली. उलगुलान म्हणजे अन्यायाविरु द्ध एकत्र येऊन लढा देणे. यासाठी तालुक्यातील आदिवासी युवकांची एकच संघटना ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

सुरगाणा :तालुक्यातील पळसन येथे युवकांनी संघटन करून आदिवासींच्या समस्या सोडविण्या करीता उलगुलानपुकारले आहे. यावेळी आद्य क्र ांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सुरगाणा तालुका हा पावसाचे माहेरघर, परंतु पाणी अडवले नसल्यामुळे तालुक्यातील बरेच गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते त्यामुळे आतापासुनच ज्या ठिकाणी पाणी असेल अशा ठिकाणी तरूणांनी एकत्र येऊन वनराई बंधारे बांधून थोडेफार पाणी संकट दूर होईल असे जलपरिषदेचे योगेश गावित यांनी सांगितले.अन्य तालुक्याच्या दरवर्षी पावसाळ्यात सरासरी अडीच ते तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो. तरी ऊन्हाळ्यात तालुक्यातील निम्या पेक्षा जास्त गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. आज पर्यंत तालुक्यात शेती सिंचनासाठी एकही मोठे धरण का झाले नाही अशा एक ना अनेक प्रश्नांनावर बैठकीत चर्चा झाली.या प्रकारच्या समस्या हेरु न त्यांचा शासनाकडे पाठपुरावा करण्या साठी प्रत्येक गावपातळीवरीलबेरोजगार युवकांनी संघिटतपणे लढा देण्याची गरज असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले.या करीता आदिवासींच्या न्याय हक्कासाठी लढा उभारु न, आदिवासी विकास युवा संघर्ष संघटना, स्थापन करण्यात आली आहे.या बैठकीला तालुक्याच्या कानाकोप-यातील युवक आयोजक यावेळी आदिवासी बचाव कृती समितीचे तालुकाप्रमुख रतन चौधरी, आदिवासी शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष पांडूरंग पवार, आदिवासी युवा संघर्ष प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष दीपक चव्हाण, हेमराज धुम हरिश्चंद्र धुम, संजय पाडवी, सचिन महाले, प्रशांत माळघरे, गणेश वाघमारे, योगेश गावित आदि उपस्थित होते. सुनिल भुसारे यांनी कार्यक्र माचे प्रस्ताविक केले.