शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकपासून उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वाजणार निवडणुकांचा बिगुल

By admin | Updated: December 23, 2016 00:14 IST

पंचायत समिती इमारतीचे उद्घाटन

नाशिक : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा शिवसेनेचा बिगूल नाशिकमधून वाजण्याची शक्यता आहे. येत्या २६ डिसेंबर रोजी नाशिकला शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नवीन पंचायत समिती इमारत उद्घाटनासह ग्रामीण भागातील विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.येत्या सोमवारी (दि.२६) नाशिकला सकाळी ११ वाजता शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. नाशिक तालुका पंचायत समितीच्या कॉर्पोरेट दर्जाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येईल. तत्कालीन पंचायत समिती सभापती व विद्यमान उपसभापती अनिल ढिकले यांनी नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम मंजुरीसाठी आमदार योगेश घोलप व माजीमंत्री शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांच्यासोबत शासन स्तरावर पाठपुरावा केला असून, आजमितीस इमारत अत्याधुनिक स्वरूपात सुसज्ज झाली आहे. त्यानंतर सिद्धप्रिंपी गावात उभारण्यात आलेल्या तालुका क्रीडा संकुलाचे उद्घाटन करण्यात येईल. त्यानंतर सिडको भागातील काही विकासकामांचे व दहा नवीन शाखांचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. दिवसभर विकासकामांचे उद्घाटन कार्यक्रम घेणारे उद्धव ठाकरे त्यानंतर पदाधिकाऱ्यांशी आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत चर्चा करणार असल्याचे समजते. नाशिकच्या विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा बिगूल वाजण्याची चिन्हे आहेत. नाशिक जिल्हा परिषदेत २१ सदस्यांसह शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असून, सत्ताधारी राष्ट्रवादी व भाजपासोबत सत्तेतही आहे. मुंबई महापालिकेत भाजपासोबत युती करण्यासाठी शिवसेना अनुकूल आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर पक्षाची नेमकी भूमिका काय असेल, याबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडून नाशिकच्या दौऱ्यात सूतोवाच होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नाशिकचा दौरा शिवसेनेसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. (प्रतिनिधी)