शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांमध्ये जीएसटीबाबत संभ्रम कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:01 IST

उद्योजकांमध्ये जीएसटीबाबत संभ्रम कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : एक देश, एक कर प्रणाली देशात लागू होऊन चार आठवड्यांचा कालावधी उलटला असला तरी, या करप्रणालीतील तरतुदींबाबत अद्यापही व्यापारी, उद्योजकांमध्ये संभ्रम कायम असल्याची बाब जिल्हा उद्योग समितीच्या बैठकीत स्पष्ट झाली. अनेक उद्योजकांनी जीएसटीबाबत प्रश्न उपस्थित केल्याने त्यावर स्पष्टीकरण देणे शक्य नसल्याचे पाहून लवकरच उद्योजकांसाठी जीएसटीबाबत प्रबोधन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिल्या. जिल्हा उद्योगमित्र समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. या बैठकीची विषय पत्रिका उद्योजकांना वेळेवर देण्यात आल्याचे उद्योजकांनी निदर्शनास आणून दिल्याने जुन्याच विषयांवर चर्चेचा घोळ घालण्यात आला. दिंडोरी औद्योगिक वसाहतीत संपादन करण्यात आलेल्या २०० हेक्टर भुखंडावर अद्यापपर्यंत एकही उद्योग सुरू होऊ शकला नसल्याची बाब चर्चिली गेली. या ठिकाणी उद्योजकांना देण्यासाठी कोणत्याही सुविधा नसल्याने उद्योजक कसे जातील, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. औद्योगिक वसाहतीपर्यंत जाण्यासाठी रस्ते नाहीत, पाण्याचीही व्यवस्था नसल्याचे सांगण्यात आले. त्यावर उद्योजकांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्याच्या तसेच जोड रस्ते तयार करण्यासाठी लागणाऱ्या भूसंपादनाची प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सातपूर औद्योेगिक वसाहतीतील मोकळ्या भुखंडावर सुशोभिकरण करण्यासाठी उद्योजकांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. या बैठकीत औद्योगिक वसाहतीतील रस्ते, सांडपाण्याची सुविधा, पथदीपांची दुरुस्ती, मालेगाव तालुक्यातील सायने येथील औद्योगिक वसाहतीतील सुविधा, औद्योगिक वसाहतीतील कचऱ्याचा प्रश्न आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीस उद्योग सहसंचालक पी. पी. देशमुख, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. रेंदाळकर, एमआयडीसीच्या हेमांगी पाटील, आयमाचे राजेंद्र अहिरे आदी उपस्थित होते.