शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

पाण्यासाठी लाक्षणिक उपोषण

By admin | Updated: June 21, 2016 00:07 IST

सटाणा : नदीजोड प्रकल्पात उत्तर महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातकडे नेण्यास विरोध

 सटाणा : नदीजोड प्रकल्पाच्या नावाखाली उत्तर महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातकडे पळविण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर प्रसंगी रक्त सांडू पण आमचे हक्काचे पाणी जाऊ दिले जाणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष रामचंद्रबापू पाटील यांनी दिला.नदीजोड प्रकल्पाच्या नावाखाली उत्तर महाराष्ट्राचे हक्काचे पाणी पळविणे बंद करा व मांजरपाडा-२ चे काम तत्काळ सुरू करा, या मागणीसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर रामचंद्रबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आले. मुळातच तापी खोरे हे त्रुटीचे खोरे आहे. त्यासाठी पाणी उपलब्ध करणे आवश्यक आहे. पाणी उपलब्ध करण्यासाठी पश्चिमेकडून अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी वळण योजनांद्वारे गिरणा, गोदावरी खोऱ्यात टाकणे गरजेचे असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी नदीजोड प्रकल्पाच्या नावाखाली हे पाणी गुजरातकडे पळवून नेण्याचा घाट घालत असल्याची टीका उपोषणकर्त्यांनी केली आहे. तसेच मांजरपाडा-२ च्या कामाला अद्यापही मुहूर्त सापडत नाही. राज्यकर्त्यांनी उदासीनता झटकून या प्रकल्पाचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी केली आहे. सायंकाळी तहसीलदार सुनील सौंदाणे यांना उपोषणकर्त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन सादर केले, त्याप्रसंगी रामचंद्रबापू पाटील यांनी उपरोक्त इशारा दिला. लाक्षणिक उपोषणात के. एन. अहिरे, दिनकर जाधव, मविप्रचे संचालक डॉ. तुषार शेवाळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय भामरे, यशवंत अहिरे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे, तालुकाध्यक्ष सुभाष नंदन, शरद शेवाळे, संजय चव्हाण, धर्मराज खैरनार, जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी, प्रकाश निकम, अनिल चव्हाण, भिकानाना सोनवणे, विजय वाघ, काका रौंदळ, संजय देवरे, शक्ती दळवी, ज. ल. पाटील, कुबेर जाधव, संजय पवार, सुभाष अहिरे, अतुल पवार, नितीन भामरे, मनोहर देवरे, उदय अहेर, बळीराम जाधव आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)