शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षातील सहप्रवाशांकडून लुटीचे प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:14 IST

अज्ञात वाहनाच्या धडकेने जखमी नाशिक: गंगापूररोडवरील सुयोजित गार्डनसमेार एका अज्ञात दुचाकीस्वाराने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने शशिकांत ढिकले (७०) जखमी ...

अज्ञात वाहनाच्या धडकेने जखमी

नाशिक: गंगापूररोडवरील सुयोजित गार्डनसमेार एका अज्ञात दुचाकीस्वाराने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने शशिकांत ढिकले (७०) जखमी झाले. सकाळच्या सुमारास ज्येष्ठ नागरिक ढिकले हे फिरण्यासाठी घराबाहेर पडले. सुयोजित गार्डनजवळ अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. घटना घडल्यानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

कारमध्ये बसत असतानाच पोत लांबविली

नाशिक : काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी कारमध्ये बसत असणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढून पलायन केल्याची घटना रविवारी मखमलाबाद रोडवर घडली. योगीता युवराज अहिरराव या मखमलाबाद रोडवरील ड्रीम कॅसलजवळील राधानगर येथे आपल्या कुटुंबासह एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपून रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्या घरी जाण्यासाठी कारमध्ये बसत असताना मधुबन कॉलनीतून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ३४ ग्रॅम वजनाची ९५ हजारांची सोन्याची पोत ओढून पलायन केले. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा रुग्णालय आवारात एकाचा मृत्यू

नाशिक : जिल्हा रुग्णालय आवारात तोल जाऊन पडलेल्या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. समाधान खंडू पाटील (३४. रा. म्हाडा कॉलनी, अंबड) हे जिल्हा रुग्णालयाच्या आवारात तोल जाऊन पडल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. कर्मचाऱ्यांनी त्यास उठविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. डॉ. आर. बी. पाटील यांनी तपासले असता ते मयत झाल्याचे त्यांना सांगितले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.