शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अवनखेडचा प्रकार : आठ महिन्यांपासून फाईलींचा प्रवास

By admin | Updated: July 26, 2016 23:46 IST

आदर्श सांसद ग्रामच्या उपकेंद्रांची नस्ती अडकली ‘नकलेत’

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या दोन कोटी रुपयांच्या वाहन खरेदीला कामापुरता नकलेचा ठराव मिळण्यास अडचण आल्यानंतर आता आदर्श सासंद ग्राम योजनेत दत्तक घेतलेले अवनखेड येथील ९५ लाख रुपयांच्या आरोग्य उपकेंद्रांच्या मंजुरीलाही कामापुरता ‘नकलेच्या’ ठरावाची आडकाठी आल्याचे समजते.दरम्यान, उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे यांची याप्रकरणी कान उघडणी करतानाच सर्व साधारण सभेत मंजुरी मिळालेल्या अवनखेड आरोग्य उपकेंद्रांच्या कार्यारंभ आदेशाला आणि प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्यास आडकाठी काय? अशी विचारणा केली. त्यावर सर्व साधारण सभेत मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात आम्हाला इतिवृत्ताची प्रत अथवा संबंधित आरोग्य उपकेंद्रांच्या कामास मंजुरीबाबत कामापुरता नक्कल मागूनही ती न मिळाल्याचे सांगितले.आदर्श सांसद ग्राम योजनेत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिंडोरी तालुक्यातील अवनखेड हे गाव दत्तक घेतले आहे. यागावात अस्तित्वात असलेल्या उपकेंद्रांच्या इमारतीला गळती लागली असून, आरोग्य उपकेंद्रांच्या इमारतीवर पावसाळ्यात प्लास्टिकचे आवदन टाकावे लागत असल्याचे चित्र आहे. जानेवारी महिन्यात येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास प्रशासकीय मान्यता मिळून आणि त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ९५ लाखांचा निधी मंजूर होऊनही आता सात महिन्यांचा कालावधी उलटला तरी या कामाचे कार्यारंभ आदेश निघालेले नसल्याचे अवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव यांचे म्हणणे आहे. याप्रकरणाची माहिती मिळाल्यावर उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी या कामांच्या निविदा आणि कार्यारंभ आदेशास काय अडचण आहे? याची विचारणा कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे यांना केली. २९ जूनला झालेल्या सर्व साधारण सभेत या उपकेंद्रास प्रशासकीय मान्यता मिळाली असून, निविदा व कार्यारंभ आदेश काढण्यास या सभेच्या ठरावाची नक्कल असल्याशिवाय या कामाचे कार्यारंभ आदेश काढता येणार नसल्याचे बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे वाहन खरेदीला आलेली कामापुरता ठरावाच्या नक्कलचीच अडचण आदर्श सांसद ग्राम असलेल्या अवनखेडच्या उपकेंद्राच्या कामास आल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)