शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक शाखेची कारवाई ; ७५ हजार दंड वसूल, शेकडो वाहनधारकांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 18:34 IST

नाशिक : नाशिक शहर वाहतूक शाखेच्या वतीने सिडको तसेच पाथर्डी फाटा येथे बेशिस्त दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांवर कारवाई करीत गेल्या तीन दिवसांत सुमारे ७५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले.शहरातील अपघाताचे वाढते प्रमाणावर आळा घालण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, याचाच ...

नाशिक : नाशिक शहर वाहतूक शाखेच्या वतीने सिडको तसेच पाथर्डी फाटा येथे बेशिस्त दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांवर कारवाई करीत गेल्या तीन दिवसांत सुमारे ७५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले.शहरातील अपघाताचे वाढते प्रमाणावर आळा घालण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, याचाच एक भाग म्हणून सिडकोतील त्रिमूर्ती चौक दिव्या अ‍ॅडलॅब , पाथर्डी फाटा, अंबड औद्योगिक वसाहत यांसह परिसरात विनाहेल्मेट व सिटबेल्ट न लावणाºया चारचाकी वाहनधारकांवर ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, तसेच सिटबेल्ट न लावणाºया चारचाकी वाहनधारकांवर तसेच कागदपत्राची पूर्तता नसणाºया शेकडो वाहनधारकांना पकडण्यात येऊन नियमांचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक शाखेच्या वतीने हेल्मेट वापरण्याबाबत सूचना तसेच प्रबोधन करण्यात येत असल्याने अनेक वाहनधारक आता हेल्मेटचा वापर करीत असल्याचे दिसून येत असले तरी अजूनही अनेक वाहनधारक हे विनाहेल्मेट दुचाकी चालवित असल्याने ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले. या बरोबरच दिव्या अ‍ॅडलॅब परिसरासह मुख्य चौक तसेच गर्दीच्या ठिकाणी वाहनपार्किंग करणाºयांची वाहणेदेखील वाहतूक शाखेच्या गाडीत नेत त्यांच्यावरदेखील दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. नाशिक शहर वाहतूक शाखेच्या वतीने पोलीस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा सुजाण नागरिकांच्या वतीने स्वागत करण्यात येत असून, अपघाताला आळा घालण्यासाठी नागरिकांनी वाहतूक शाखेचे नियम पाळणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.