शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी झाडावर धडकून दोघा युवकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:18 IST

सिन्नर : सिन्नरकडून संगमनेरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघात माळेगाव औद्योगिक वसाहतीतील दोघा युवकांचा मृत्यू ...

सिन्नर : सिन्नरकडून संगमनेरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघात माळेगाव औद्योगिक वसाहतीतील दोघा युवकांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. माळेगाव औद्योगिक वसाहतीत जिंदाल कॉलनीत राहणारे अजयकुमार अमरचंद इंदोरा (३२) व सुनील शिवचरण सूर्यवंशी (२२) हे दोघे युवक रात्री नऊ वाजेच्या सुमारास सिन्नरकडून संगमनेरच्या दिशेने जात होते. त्यांची होंडा शाईन दुचाकी(एम.एच. १५ एफ.झेड. ४४७४) ही गुरेवाडी फाट्याजवळ सोनवणे पेट्रोल पंपासमोर चिंचेच्या झाडावर जाऊन आदळली. या अपघात दोघा युवकांच्या हात-पायाला व डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी दुचाकी चालक मृत अजयकुमार इंदोरा याच्याविरोधात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणे, भरधाव वाहन चालवणे व स्वत:च्या आणि सोबत असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार टी.एस. चौधरी अधिक तपास करीत आहेत.

फोटो ओळी- सिन्नर-संगमनेर रस्त्याजवळ गुरेवाडी फाट्यानजीक झालेल्या अपघातातील दुचाकी. (१५ सिन्नर ॲक्सिडेंट)

150921\15nsk_32_15092021_13.jpg

१५ सिन्नर ॲक्सीडेंट