शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या कोठ्यांचा दोन वर्षांनंतरही लागेना मेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 01:25 IST

विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनासाठी देण्यात येणारा तांदूळ व अन्य वस्तू साठविण्यासाठी शाळांना दोन वर्षांपूर्वी लोखंडी कोठ्या घेण्यासाठी पैसे देण्यात आले; परंतु शाळांनी कोठ्या घेतल्या किंवा नाही याबाबतची कोणतीही माहिती शिक्षण विभागाला देण्यात आलेली नाही.

नाशिक : विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनासाठी देण्यात येणारा तांदूळ व अन्य वस्तू साठविण्यासाठी शाळांना दोन वर्षांपूर्वी लोखंडी कोठ्या घेण्यासाठी पैसे देण्यात आले; परंतु शाळांनी कोठ्या घेतल्या किंवा नाही याबाबतची कोणतीही माहिती शिक्षण विभागाला देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोठ्या घेतल्या की नाही, घेतल्या असतील तर जिल्ह्यात किती कोठ्या घेतल्या गेल्या याचा कोणताही मेळ दोन वर्षांनंतरही लागू शकलेला नाही.शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्याबरोबरच त्यांच्या पोषणासाठी माध्यान्ह भोजनाची योजना सुरू केली. या योजनेनुसार प्रत्येक शाळेला तांदूळ, डाळ, तेल, मीठ, मीरची आदी वस्तू शासनाकडून पुरविल्या जातात. शाळेच्या आवारातच माध्यान्ह भोजन तयार करण्याच्या सूचना असून, त्यासाठी प्रत्येक शाळेत किचन शेडही उभारण्यात आले आहे. परंतु शाळांना भोजनासाठी पुरविण्यात येणाऱ्या वस्तू साठविण्याची कोणतीही सोयीसुविधा नसल्याची बाब मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यानुसार राज्य सरकारने राज्य पातळीवरच निर्णय घेऊन शासकीय शाळा व खासगी शाळांना लोखंडी कोठ्या पुरविण्याचे ठरविले. प्रतिनग एका कोठीस ९६५ रुपये याप्रमाणे शाळांना पैसे वाटप करून शाळांना आपापल्या पातळीवरच त्याची खरेदी करावी अशा सूचना केल्या होत्या. सन २०१७ मध्ये कोठ्या घेण्यासाठी जिल्हा परिषदेने सर्वच शाळांच्या बॅँक खात्यावर लाखो रुपये वर्ग करण्यात आले. दरम्यान, सर्वच शाळांचे बॅँक खाते नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत असल्यामुळे नोटाबंदीनंतर जिल्हा बॅँक आर्थिक अडचणीत सापडली व बॅँकेने त्यांच्याकडील खातेदारांचे पैसे देण्यावर निर्बंध लादले. परिणामी शाळांना कोठ्यांचे पैसे मिळू शकले नाहीत. साधारणत: वर्षभर पाठपुराव्यानंतर जिल्हा परिषदेने जिल्हा बॅँकेबरोबरचे आर्थिक संबंध संपुष्टात आणल्यानंतर काही प्रमाणात शाळांना त्यांचे पैसे परत मिळाले. त्यानंतर शाळांना कोठ्या खरेदी केल्या असाव्यात असे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे म्हणणे असले तरी, दोन वर्षे उलटूनही अनेक शाळांकडून कोठ्या खरेदीचा तसा ‘रिपोर्ट’ आला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शाळांनी खरोखरच कोठ्या खरेदी केल्या काय, केल्या असल्यास त्या किती आहेत याची अद्ययावत आकडेवारी शिक्षण विभागाकडे उपलब्ध नाही. परिणामी शाळांच्या कोठ्या नेमक्या कोठे आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदEducation Sectorशिक्षण क्षेत्र