शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

एकाच कामाचे दोन कार्यारंभ आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 01:23 IST

मालेगाव मध्य : मनपा हद्दवाढीतील म्हाळधे शिवारातील गट क्रमांक १२६ मधील प्रार्थना स्थळाच्या संरक्षक भिंतीच्या कामाची निविदा महापालिका प्रशासनाने काढून कार्यारंभ आदेश देवूनही सदर कामाबाबत मनपाने सार्वजनिक बांधकाम विभागालाही निविदा काढण्यास नाहरकत दाखला दिला आहे. परिणामी एकाच कामाचे दोन कार्यारंभ आदेश निघाल्याचा प्रताप उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधितांनी चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवक अतिक कमाल यांनी केली आहे.

ठळक मुद्देविकास कामे प्रस्तावित करण्यापूर्वीच मनपाकडून कामांविषयी नाहरकत पत्र

मालेगाव मध्य : मनपा हद्दवाढीतील म्हाळधे शिवारातील गट क्रमांक १२६ मधील प्रार्थना स्थळाच्या संरक्षक भिंतीच्या कामाची निविदा महापालिका प्रशासनाने काढून कार्यारंभ आदेश देवूनही सदर कामाबाबत मनपाने सार्वजनिक बांधकाम विभागालाही निविदा काढण्यास नाहरकत दाखला दिला आहे. परिणामी एकाच कामाचे दोन कार्यारंभ आदेश निघाल्याचा प्रताप उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधितांनी चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवक अतिक कमाल यांनी केली आहे.गट क्रमांक १२६ मधील संरक्षक भिंत कामाबाबत महागठबंधन आघाडीचे नगरसेवक अतिक कमाल यांनी मनपा आयुक्त किशोर बोर्डे व सां. बा. विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनपा हद्दवाढीतील म्हाळदेशिवार गट नं. १२६ येथील प्रार्थना स्थळाचे संरक्षक भिंत बांधण्यासाठी १४ लाख ६९ हजार ८६ रूपयांच्या कामास महासभा ठराव क्रमांक १०११ नुसार मंजुरी देण्यात आली. त्यानुसार मनपा बांधकाम विभागाकडून निविदा मागविण्यात येवून शरद पाटील यांची निविदा मंजूर करण्यात आली होती. गेल्या २१ मार्च २०१८ रोजी कार्यादेश देण्यात आले होते. स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत याच ठिकाणच्या कामाचा समावेश करण्यात आले. त्यानुसार सां. बा. विभागाने मनपास याठिकाणी विकास कामे करण्यास्तव मनपाकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी पत्र व्यवहार केला होता. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ५ आॅक्टोबर २०१८ रोजी निविदा काढण्यात आली. मक्तेदार एम. एम. खान यांची २६ लाख ६३ हजार ३३२ रूपयांची निविदा स्विकारण्यात येवून २२ नोव्हेंबर २०१८ रोजी कार्यादेश देण्यात आले. यामुळे एकाच कामाच्या दोन निविदा काढल्या जावून प्रत्यक्षात कार्यादेशही दिले गेले असल्याचे समोर आले आहे.मनपा हद्दीतील विकास कामे प्रस्तावित करण्यापूर्वीच मनपाकडून कामांविषयी नाहरकत पत्र घेण्यात येते. त्यानुसार सदर कामाबाबतही मनपाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार मनपाने जा. क्र. १०६९/१८ दिनांक २९ जुलै २०१८ रोजी ना हरकत पत्र दिले आहे. त्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात आली आहे.-राहूल पाटील, सहाय्यक अभियंता, सा. बां. उपविभाग, मालेगाव.