शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गिरणारे जवळ अपघातात दोन महिलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:20 IST

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गिरणारे-धोंडेगाव रस्त्याने बुधवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास पालवे कुटुंबीय त्यांच्या टेम्पोत (एम.एच१५ एफ.यु ९३६३) ...

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गिरणारे-धोंडेगाव रस्त्याने बुधवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास पालवे कुटुंबीय त्यांच्या टेम्पोत (एम.एच१५ एफ.यु ९३६३) बसून गिरणारेकडून गंगाम्हाळुंगीच्या दिशेने प्रवास करत होते. यावेळी हरसुलच्या दिशेने गिरणारेकडे माती वाहून नेणारा अवजड ट्रक (एम.एच.०४ डीडी९०७०) भरधाव जात होता. ट्रक चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत वाहनावरील नियंत्रण गमावून समोरुन टेम्पोला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत जाऊन उलटला. यावेळी टेम्पोतील महिला, पुरुष बाजूला फेकले गेले. रात्रीच्या अंधारात कोण कुठे जाऊन पडले, हे कुणालाही कळत नव्हते. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत जखमींना तात्काळ खासगी वाहनाने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले. तसेच रुग्णवाहिकांशी संपर्क साधून अपघातस्थळी मदत देण्याची मागणी केली. काही वेळेत रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहचल्या. सर्व जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचार सुरु असताना रात्रीच्या सुमारास निर्मला जनार्दन पालवे (३०) तर गुरुवारी सकाळी रेखा ऊर्फ पुनम वाल्मिक पालवे (३५,दोघी, रा.गंगाम्हाळुंगी) यांचा मृत्यू झाला. तसेच टेम्पोचालक बाळु अर्जुन पालवे (३८), यशवंत काशिनाथ पालवे (४०), यमुना श्रावण पालवे (३०), भागाबाई भगवान पालवे (३०), तुळसाबाई तुळशीराम पालवे (४०), शिलाबाई देवानंद पालवे (४०,सर्व रा. गंगाम्हाळुंगी) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ट्रकचालक अपघातानंतर ट्रक सोडून फरार झाला असून त्याच्याविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुरुवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.

---

फोटो आर वर २५गिरणारे नावाने.

अपघातग्रस्त ट्रक व झालेली गर्दी

===Photopath===

250221\25nsk_27_25022021_13.jpg

===Caption===

अपघातग्रस्त ट्रक व झालेली गर्दी