शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात दोन दुचाकींची चोरी, एकीची जाळपोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 01:09 IST

नाशिक : पंचवटीतील परिसरातील इंद्रकुंड आणि दिंडोरीरोडवरून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. मखमलाबादरोड परिसरातील शांती कॉलनीतील ऋषिकेश उत्तम चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या रविवारी (दि. २२) मध्यरात्री दिंडोरीरोडवर पार्क केलेली २५ हजार रुपये किमतीची मोपेड एमएच १५ डीआर ८९२४ अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.

ठळक मुद्देदोन दुचाकींची चोरी, एकीची जाळपोळ

 

नाशिक : पंचवटीतील परिसरातील इंद्रकुंड आणि दिंडोरीरोडवरून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. मखमलाबादरोड परिसरातील शांती कॉलनीतील ऋषिकेश उत्तम चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या रविवारी (दि. २२) मध्यरात्री दिंडोरीरोडवर पार्क केलेली २५ हजार रुपये किमतीची मोपेड एमएच १५ डीआर ८९२४ अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.दुसरी दुचाकी इंद्रकुंडावर असलेल्या शिवमुद्रा प्रतिष्ठान येथून चोरट्यांनी चोरून नेली आहे. पेठरोड परिसरातील रवींद्र अशोक सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार, ३० हजार रुपये किमतीची होंडाशाइन दुचाकी क्रमांक एमएच १५ एफआर २८४२ अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर पेठरोडवरील वडारवाडीतून चोरलेली पल्सर दुचाकी नवनाथनगरमधील पंचशील कॉम्प्लेक्स येथे जाळून टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. संशयित सूरज धोत्रे याने बजाज पल्सर दुचाकी एमएच १५ एफपी ८५३९ चोरल्यानंतर नवनाथनगरमधील पंचशील कॉम्प्लेक्स येथे ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याची फिर्याद अनिल म्हस्के यांनी दिली आहे. यात सीट, साईट पॅनल, पेट्रोल टाकी जळून खाक झाली.एकास बेदम मारहाणतपोवनातून आल्याच्या क्षुल्लक कारणावरून अनोळखी चौघांनी एकाला बेदम मारहाण करीत डोक्यात वीट मारून जखमी केल्याची घटना घडली. द्वारका परिसरातील स्वप्नील केशव मोटकरी (२८)यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या मंगळवारी (दि. २४) रात्री ८ वाजेच्या सुमारास मोटकरी हे द्वारका येथील विलास फूल भांडार येथे उभा असताना, अनोळखी चौघांनी तू तपोवनातून का आलास, असे विचारून मारहाण केली, तर एकाने हातातील वीट मोटकरीच्या डोक्यात मारून जखमी केले. त्यानंतर संशयित पसार झाले.मोबाईल हिसकावलासातपूर महापालिकेच्या विभागीय कार्यालयाजवळ तरुणाच्या हातातील १२ हजार रुपयांचा मोबाइल दुचाकीस्वारांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. स्वारबाबानगर येथील विवेक अनिल चव्हाण गेल्या रविवार (दि.२२) सातपूरच्या मनपा विभागीय कार्यालयासमोरून पायी जात होता. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्याच्या हातातील मोबाइल हिसकावून पोबारा केला.