याबाबत अधिक माहिती अशी, चाडेगाव येथील शेतकरी विनायक गणपत नागरे (४५) हे मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास त्यांच्या स्प्लेंडर दुचाकीने ((एमएच१५ एचबी ०९५२) दत्तमंदिर सिग्नल येथून जात होते. सिग्नल सुटल्यानंतर नाशिककडे जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या दुधाच्या टँकरच्या (जीजे१९ एक्स१८९९) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे नागरे खाली कोसळले व टँकरचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. टँकरचा वेग इतका होता की, त्याच्या पुढच्या चाकांपुढे दुचाकी अडकली तरीदेखील टँकरचालकाने वेग कमी न करता अडकलेली दुचाकी थेट दत्तमंदिरच्या बस थांब्यापर्यंत फरफटत नेल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.
दत्त मंदिर सिग्नलच्या भर चौकात अपघात घडल्याने चारही बाजूला वाहनाच्या लांबच लांबरांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच बिटको पोलिस चौकीचे सहाय्यक निरीक्षक मन्नवरसिंग परदेशी यांच्यासह उपनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, वाहतूक पोलीसही घटनास्थळी पोहचले. टँकरसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन उपनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
===Photopath===
220621\22nsk_39_22062021_13.jpg
===Caption===
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार