शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:12 IST

--- रेल्वेखाली आत्महत्या नाशिक रोड : ओढा रेल्वे स्थानकादरम्यान जळगावकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावरील पोल क्रमांक १९१/०७ येथे रविवारी रात्री आठ ...

---

रेल्वेखाली आत्महत्या

नाशिक रोड : ओढा रेल्वे स्थानकादरम्यान जळगावकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावरील पोल क्रमांक १९१/०७ येथे रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास अनोळखी इसमाने रेल्वेसमोर येत आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या इसमाची ओळख पटलेली नसून याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

----

‘पीपल्स’च्या शहराध्यक्षाविरुद्ध गुन्हा

नाशिक रोड : जेल रोड येथील राजराजेश्वरी मंगल कार्यालयात पीपल्स रिपाइंची राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केल्याप्रकरणी पीपल्स यूथच्या शहराध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी पीपल्स रिपाइं राज्य पदाधिकाऱ्यांची बैठक व नूतन प्रदेशाध्यक्षपदी गणेश उन्हवणे यांची निवड झाल्याबाबत सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहरात जमावबंदीचा आदेश असताना तो भंग केला, सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमास बंदी असताना त्याचा भंग करून कोरोना संसर्गजन्य आजार पसरविण्याची कृती केली म्हणून याप्रकरणी पीपल्स यूथ फोरमचे शहराध्यक्ष संशयित नीलेश उन्हवणे यांच्याविरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---

आगरटाकळीत युवकावर शस्त्राने वार

नाशिक रोड : आगरटाकळीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलसमोर जुन्या भांडणाची कुरापत काढत युवकाला शिवीगाळ करून मारहाण करत धारदार हत्याराने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे.

आगरटाकळी, सोनवणेबाबा चौक येथील अमोल अच्युतराव पाईकराव याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास आंबेडकर हॉलसमोर गवारे यांच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी तो उभा होतो. संशयित ओंकार सूर्यवंशी (वैदूवाडी, टाकळी) याने चार महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून अमोलला शिवीगाळ करून मारहाण केली. धारदार हत्याराने हाताच्या दंडावर वार करून जखमी केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---

गांजा सेवनाने दोघांना अटक

नाशिक रोड : विहीतगाव स्मशानभूमी शेडमध्ये गांजा पिणाऱ्या दोन युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विहीतगाव स्मशानभूमी शेडमध्ये शनिवारी रात्री आठच्या सुमारास उपनगर पोलिसांना बाळा ऊर्फ प्रवीण मच्छिंद्र डोके (३१, कोठुळे चाळ, गुरकृपालान्स, वडने रोड) आणि विशाल अमर सावंत (३५, साठेनगर, देवळालीगाव) हे दोघे रोजीला पेपरमध्ये गांजा हा अमली पदार्थ भरून सेवन करत असल्याचे समजले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.