शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:26 IST

---- दुचाकीच्या धडकेत एक जण जखमी मालेगाव : मुंबई - आग्रा महामार्गावर चिखलओहोळ शिवारात एका दुचाकीस्वाराने दुसऱ्या दुचाकीला धडक ...

----

दुचाकीच्या धडकेत एक जण जखमी

मालेगाव : मुंबई - आग्रा महामार्गावर चिखलओहोळ शिवारात एका दुचाकीस्वाराने दुसऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी सुभाष महादू खिळे, रा. अनकवाडी, जि. धुळे यांनी फिर्याद दिली आहे. खिळे हे दुचाकीने (क्र. एमएच १९ डीक्यू ०२१५) जात असताना दुचाकीवरील उमेश निवृत्ती जाधव, रा. खरजाई, ता. चाळीसगाव यांच्या दुचाकीला (क्र. एमएच १९ बीके ६३१२) पाठीमागून धडक दिली. या धडकेत खिळे जखमी झाले आहेत. पुढील तपास हवालदार गुजर करीत आहेत.

----

मारहाण करणाऱ्या तिघा जणांविरुद्ध गुन्हा

मालेगाव : शहरातील गोल्डननगर भागात किरकोळ कारणावरून एका जणाला मारहाण करणाऱ्या तिघा जणांविरुद्ध पवारवाडी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी इफ्तेखार अहमद अतिक अहमद यांनी फिर्याद दिली. कारखान्याशेजारी कचरा का जाळला अशी कुरापत काढून शहेजाद अहमद जहीर अहमद, जिशान जहीर अहमद, कामरान जहीर अहमद, रा. गोल्डननगर यांनी लाकडी दांड्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार फुलमाळी करीत आहेत.

----

किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण

मालेगाव : शहरातील नाहीद मशिदीजवळ उभ्या असलेल्या जाकीर हुसेन मुजफ्फर हुसेन या तरुणाला किरकोळ कारणावरून वसीम नाट्या (पूर्ण नाव माहीत नाही) याने लोखंडी पाइपने गंभीर मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जाकीर याने फिर्याद दिली आहे. पुढील तपास हवालदार गांगुर्डे हे करीत आहेत.

----

डंपरच्या धडकेत दोघे जखमी

मालेगाव : मुंबई - आग्रा महामार्गावरील दरेगाव शिवारात अज्ञात डंपर चालकाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघे जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी अशोक भिवसिंग जाधव, रा. साजवहाळ यांनी फिर्याद दिली आहे. श्याम अशोक जाधव व गोविंद साहेबराव जाधव हे दुचाकीवरून (क्रमांक एमएच ४१ के १५७६) जात असताना डंपरने (क्र. एमएच ४१ ईजे २६८५) धडक दिली. यात दोघे जखमी झाले. पुढील तपास हवालदार गोसावी करीत आहेत.

----

पत्नीवर कटरने वार करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा

मालेगाव : शहरातील गौसीया मशिदीजवळ राहणाऱ्या महिलेवर कटरने वार करून जखमी करणाऱ्या पती फिरोज शेख नबी यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शकिला शेख फिरोज उर्फ परवीन हिने फिर्याद दिली आहे. पती फिरोज शेख हा मद्य पिऊन घरी आला असता त्याला कामावर का गेला नाही, मद्य का पिले असे विचारले असता त्याचा राग येऊन त्याने कटरने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार काळे करीत आहेत.