शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

दुचाकी चोरटे चतुर्भुज

By admin | Updated: January 7, 2017 01:27 IST

१८ दुचाकी जप्त : स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची कारवाई

नाशिक/मालेगाव : जिल्ह्यातील विविध भागांतून वाहने चोरी करणाऱ्या दोघांना पकडण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे. संशयितांकडून १८ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. या दोघांच्या अटकेने अनेक चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.सागर अशोक वाघ (भाटगाव, ता. येवला) आणि मनोज ऊर्फमुन्ना बळीराम पवार (आघार, ता. मालेगाव) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या दोघांनी मालेगाव शहर, येवला, लासलगाव यासह ग्रामीण भागातील मुख्य बाजारपेठ, मार्केट यार्ड, शाळा-कॉलेजेस आदि ठिकाणांहून दुचाकी चोरी केल्याचे पुढे आले आहे. पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. मालेगाव युनिटचे उपनिरीक्षक बालाजी मुसळे, हवालदार सुनील आहिरे, विकास शिरोळे, सुहास छत्रे, वसंत महाले, राजू मोरे, राकेश उबाळे, देवा गोविंद, रतिलाल वाघ आदिंच्या पथकाने भाटगाव गाठून सागर वाघ याच्या मुसक्या आवळल्या असता वाहनचोरीचा उलगडा झाला. वाघ याच्या ताब्यातून पोलिसांनी दोन दुचाकी जप्त केल्या. या चोरी केलेल्या दुचाकी आघार येथील अमृत ऊर्फआबा आत्माराम बच्छाव आणि ज्ञानेश्वर बाळासाहेब शिंदे या दोघांच्या ताब्यात दिल्या. चोरीची वाहने बच्छावच्या गॅरेजवर विक्र ीसाठी ठेवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी आघार फाट्यावरील भैरवनाथ दुचाकी गॅरेजवर छापा मारला. या छाप्यात विविध कंपन्यांच्या १८ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून, संशयितानी वाहनांचे नंबर बदलले आहेत. या प्रकरणी संशयितांविरोधात येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, नंबर प्लेट्स खऱ्या नसल्याने पोलिसांना मूळ मालकांचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. वाहन चोरी झालेल्या मालकांनी चेसीज व इंजिन नंबर सोबत ठेवून येवला शहर पोलीस ठाण्यात संपर्कसाधावा, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आहे.(प्रतिनिधी)