शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

उमराणेच्या दोन वॉर्डात रंगणार दुरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:44 IST

उमराणे : जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात चर्चा रंगलेल्या देवळा तालुक्यातील उमराणे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध ...

उमराणे : जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात चर्चा रंगलेल्या देवळा तालुक्यातील उमराणे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध न होता दोन जागांसाठी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यात वाॅर्ड क्रमांक १ मधून भरत काशिनाथ देवरे व ललित भाऊसाहेब देवरे, तर वाॅर्ड क्रमांक ४ मधून भूषण जमधाडे व बापू जमधाडे यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांचा प्रचाराचा शुभारंभ झाला आहे.१७ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत १५ जागा बिनविरोध झाल्या आहेत. दरम्यान ग्रामसभेतील लिलाव आणि ग्रामपंचायत निवडणुकीचा कोणताही संबंध नसून गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या रामेश्वर मंदिराचे काम पूर्ण करण्यासाठी २८ डिसेंबरच्या ग्रामसभेत बोली लागली होती, असा दावा उमराणे ग्रामस्थांनी केला असून तसे पत्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रशांत विश्वासराव देवरे यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले आहे.

दर वर्षाच्या शेवटच्या सोमवारी गावात ग्रामसभा होत असते ही गावची परंपरा असून गेल्या अनेक वर्षांपासून ती अखंडितपणे सुरु आहे. यावर्षीही २८ डिसेंबर रोजी ग्रामसभा घेण्यात आली. गावातील रामेश्वर मंदिराचे रखडलेले जीर्णोद्धाराचे काम पूर्ण करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा सुरु होती. गावकऱ्यांनी जीर्णोद्धारासाठी वर्गणी जाहीर केलेली आहे. त्याची रक्कम तीन कोटी ६६ ला‌‌ख रुपये इतकी होते. प्रत्यक्षात मात्र कमिटीकडे केवळ ३५ लाख रुपये जमा झालेले असल्याने उर्वरित रक्कम गोळा करुन देण्याबाबतची चर्चा सुरु असताना सुनील देवरे यांनी २.०५ कोटी रुपये जमा करुन देण्याची हमी घेतली आहे. याचा ग्रामपंचायत निवडणुकीशी कोणताही संबंध नाही असे प्रांतांना दिलेल्या पत्रात देवरे यांनी म्हटले आहे.

अद्याप सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झालेले नाही. ग्रामपंचायत निवडणुकीचा लिलाव करण्याचा प्रश्नच येत नाही. सुमारे २५ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतीची सत्ता हस्तगत करण्यासाठी इतक्या मोठ्या रकमेची बोली लागूच शकत नसल्याचे प्रशांत देवरे यांनी सांगितले.

कोट -

दरवर्षी गावाची वार्षिक बैठक होत असते. यावर्षी योगायोगाने या काळात ग्रामपंचायत निवडणूक आल्याने हा सर्व घोळ झाला आहे. रामेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम आणि निवडणूक हे दोन स्वतंत्र विषय असून त्या बैठकीतील विषयाचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही.

- प्रशांत देवरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य , उमराणे