शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यासाठी दोन ‘ट्रुनॅट’ मशीन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:37 IST

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या पाहून शासनाकडून नाशिक जिल्ह्यासाठी दोन ट्रुनॅट मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातील एक मशीन नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये, तर दुसरे मशीन मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आले आहे. बुधवारपासून या दोन्ही मशीनवर नमुन्यांची चाचणी करण्यात येणार असून, त्यामुळे जिल्ह्यातील अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होऊ शकणार आहे.

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या पाहून शासनाकडून नाशिक जिल्ह्यासाठी दोन ट्रुनॅट मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातील एक मशीन नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये, तर दुसरे मशीन मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आले आहे. बुधवारपासून या दोन्ही मशीनवर नमुन्यांची चाचणी करण्यात येणार असून, त्यामुळे जिल्ह्यातील अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होऊ शकणार आहे.सध्या नाशिक शहरातील बाधितांच्या किंवा अन्य उपचारांसाठदेखील दाखल होणाऱ्या संशयितांच्या नमुन्यांची तपासणी पुण्याच्या प्रयोगशाळेत तर मालेगावच्या संशयितांची तपासणी धुळ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड तपासणी केंद्रात केली जाते. मात्र, या दोन्ही ठिकाणी प्रचंड लोड आल्याने या दोन्ही ठिकाणी संशयितांचा अहवाल मिळण्यास दोन दिवसांचा वेळ लागत होता. एखादा संशयित बाधित आहे किंवा नाही, हे कळण्यास इतका विलंब लागत असल्याने रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक तेवढा काळ पूर्णपणे दबावाखाली असतात. म्हणजे एखाद्या संशयिताचा अहवाल निगेटिव्ह आला तरी दरम्यानचे दोन-तीन दिवस त्या व्यक्तीने आणि कुटुंबीयांनी प्रचंड तणावात घालविलेले असतात. त्यामुळे हा विलंब टळावा आणि सर्व संशयितांचा अहवाल एका दिवसातच मिळावा किंवा काही पर्यायी यंत्रणा उभी करावी या उद्देशाने शासनाच्या क्षयरोग नियंत्रण विभागाच्या वतीने हा ट्रुनॅट मशीनचा तोडगा काढण्यात आला आहे. नाशिक आणि मालेगाव शहराच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करून हे ट्रुनॅट मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.-------------------कोविड संशयित रुग्णाच्या इमर्जन्सी केसेस किंवा गर्भवती महिलांच्या तातडीच्या चाचणीसाठी ट्रुनॅट मशीन वरदान ठरणार आहे. या चाचणीला बुधवारपासून प्रारंभ होणार असून, दिवसाला किमान २४ ते २६ चाचण्यांचे अहवाल त्यातून मिळू शकतील. त्यामुळे अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाणदेखील घटण्यास मदत होणार आहे.डॉ. कल्पना कुटे, आरोग्य अधिकारी , झाकीर हुसेन रुग्णालय

टॅग्स :Nashikनाशिक