शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

गावठाणातील दोन हजार अतिक्रमित घरे नियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 20:50 IST

गेल्या वर्षी तत्कालीन सरकारने ग्रामपंचायत हद्दीतील परंतु गावठाण म्हणून असलेल्या सरकारी जागेवर अतिक्रमित करून राहणाऱ्या घरांना आहे त्याच ठिकाणी व तितक्याच जागेवर नियमित करण्याचा निर्णय घेतला

ठळक मुद्देमोठा दिलासा : जिल्हा परिषदेच्या तत्परतेने प्रश्न मार्गीअतिक्रमित घरांची माहिती गोळा करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ग्रामीण भागात गावाठाणातील जागेवर अतिक्रमण करून घर बांधलेल्या जिल्ह्यातील सुमारे २२०० अतिक्रमित घरधारकांना जिल्हा परिषदेने मोठा दिलासा दिला असून, शासनाने दिलेल्या आदेशान्वये अशी घरे कायदेशीर व तांत्रिक बाबींची पूर्तता करून नियमित करण्यात आली आहेत. यापुढे गावठाणातील घरांना ग्रामपंचायतींकडून करआकारणी तसेच विकासकामांचा लाभही मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या वर्षी तत्कालीन सरकारने ग्रामपंचायत हद्दीतील परंतु गावठाण म्हणून असलेल्या सरकारी जागेवर अतिक्रमित करून राहणाऱ्या घरांना आहे त्याच ठिकाणी व तितक्याच जागेवर नियमित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींनी आपल्या हद्दीतील गावठाणातील अतिक्रमित घरांची माहिती गोळा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. गावठाणात घरे बांधणारे शक्यतो निराधार, बेघर व आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटक असून, गावात जागा घेऊन स्वत:चे घर बांधण्याची या घटकाची कुवत नसल्याने त्यांनी ग्रामपंचायतीच्या सहमतीने गावठाणातील मोकळ्या जागेत स्वत:साठी निवारा बांधलेला आहे. गावठाणातील जागा देखभालीसाठी ग्रामपंचायतीच्या ताब्यात असली तरी, या जागेवर मूळ मालकी सरकारची असल्याने त्यावर बांधलेली घरे शासन दप्तरी अतिक्रमित म्हणून ठरविण्यात आली होती. अशा अतिक्रमित घरांना घरपट्टी, पाणीपट्टी तसेच त्यांच्यासाठी दिवाबत्ती वा मूलभूत सुविधा देताना ग्रामपंचायतींना हात अखडता घ्यावा लागत होता. परिणामी गावठाणात राहणा-या नागरिकांना गावाबाहेर अश्रित म्हणूनच आसरा घ्यावा लागत होता. शासन एकीकडे शहरी भागातील झोपडपट्ट्या नियमित करीत असताना ग्रामीण भागातील दुर्बल घटकांना त्याचा लाभ मिळावा म्हणून शासनाने हा निर्णय घेतला होता. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी ग्रामपंचायत विभागाकडून जिल्ह्यातील १३८३ ग्रामपंचायतींकडून गावठाणातील अतिक्रमित घरांची माहिती मागविली होती. त्यानुसार ग्रामसेवकांनी अशा घरांचा शोध घेऊन त्याची माहिती आॅनलाइन अपलोड केली होती. ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी याकामी लक्ष घालून जिल्ह्यातील सुमारे २२०० अतिक्रमित घरे नियमित केली आहेत.सन २०११ पूर्वीच्या गावठाणातील अतिक्रमित घरे कायदेशीर बाबींची पूर्तता करून नियमित करण्याचे, तर २०११ नंतरच्या काळात गावठाणात झालेले अतिक्रमित घरांसाठी त्यांनी अतिक्रमण केलेल्या जमिनीच्या रेडीरेकनर दराच्या ५० टक्के दर आकारणी करून ही घरे नियमित करण्यात आली आहेत. आता या घरमालकांना ग्रामपंचायतीच्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद