शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोविड भरपाईच्या बनावट मॅसेजमुळे आले दोन हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:19 IST

नाशिक : कोविड आजारामुळे मयत झालेल्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रूपये भरपाई मिळणार असल्याचा बनावट मॅसेज सेाशल मीडियावर ...

नाशिक : कोविड आजारामुळे मयत झालेल्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रूपये भरपाई मिळणार असल्याचा बनावट मॅसेज सेाशल मीडियावर फिरत असल्याने जिल्हा प्रशासनाकडे भरपाईची मागणी करणारे सुमारे दोन हजार अर्ज प्राप्त झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. केंद्र किंवा राज्य शासनाकडून अशा प्रकारे कोणतीही याेजना आलेली नसतांनाही आलेल्या अर्जाला काय उत्तर द्यावे असा पेच जिल्हा प्रशासनापुढे निर्माण झाला आहे.

कोरोनाच्या महाभयंकर लाटेमुळे अनेकांना आपल्या आप्तेष्टांना गमावावे लागले आहे. लाखो रुपये खर्च करूनही रुग्णांना वाचविता आलेले नाही. सर्वांत दु:खद बाब म्हणजे अनेक मुले अनाथ झाली असून, काहींनी आई किंवा वडील यापैकी एक पालक गमावलेला आहे. घरातील कर्ती व्यक्ती गेल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे. कमी अधिक प्रमाणात अनेकांना या कटू अनुभवाचा सामना करावा लागलेला असताना अशा परिस्थितीत आधाराची अपेक्षा असलेल्या कुटुंबीयांची एका बनावट मॅसेजमुळे नाहक धावपळ झाली.

कोरोनामुळे दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना केंद्राकडून आर्थिक मदत केली जाणार असल्याचे मॅजेस गेल्या पंधरा दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहे. केंद्राच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संबंधित कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याच्या आशयाचे हे मॅसेज असून, मदतीसाठी करावयाचा अर्ज, न्यायालयाचा निकाल आणि मंत्रालयाचे पत्र असेदेखील पुष्ट्यर्थ जोडण्यात आलेले आहे. हे सर्व कागदपत्रे भरून जिल्हाभरातील हजारो गरजूंनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली आहे. चार लाखांची भरपाई मिळावी असे अर्ज आवक-जावक विभागात जमा झाले आहेत, तर काहींनी आपत्ती व्यवस्थापन कक्षात अर्ज आणून दिले आहेत. याशिवाय अशाप्रकारे अर्ज घेऊन रोजच कुणी ना कुणी कार्यालयात घेऊन येत असल्याने जिल्हा प्रशासनही गोंधळात पडले आहे. केंद्र किंवा राज्य शासनाकडून अशा प्रकारची कोणतीही योजना जिल्हा प्रशासनाकडे आलेली नसून हा बनावट मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच कळविले आहे. असे असतांनाही अजूनही मदतीच्या अपेक्षेने गरजू लोक जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारत आहेत.

--इन्फेा-

उलट टपाली कळविणार!

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागात अशा प्रकारचे सुमारे दोन हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. ज्या अपेक्षेने नागरिकांनी अर्ज केले आहेत त्यांना उत्तर देणे गरजेचे असल्याने अर्ज केलेल्यांना उलट टपाली उत्तर देण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून गांभीर्याने विचार सुरू असल्याचे समजते. कोविड नुकसानीबाबत अशा प्रकारे कोणतीही योजना सध्यातरी नसल्याचे संबंधितांना कळविण्यात येणार असल्याचे कळते.