शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बैल धुण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

By admin | Updated: September 2, 2016 01:26 IST

बैल धुण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

दिंडोरी/मनमाड : पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या दोघांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब आणि मनमाडनजिक सदर घटना घडल्या. दोघांच्या मृत्यूमुळे दोन्ही गावात पोळा सणावर शोककळा पसरली. प्रकाश मुळाणे (मडकीजांब) आणि योगेश काळे (मनमाड) अशी मृतांची नावे आहेत. मडकीजांब येथे प्रकाश राजेंद्र मुळाणे हा वडिलांसोबत पाझर तलावावर बैल धुण्यासाठी गेला होता. वडील बैल धूत असताना पाठीमागे असलेला प्रकाश पाण्यात बुडाला. त्याचा ग्रामस्थांनी शोध घेतला मात्र तो सापडला नाही. दुसरी घटना मनमाड येथून जवळच असलेल्या पांझणदेव (ता. नांदगाव) येथील युवकाचा पोळ्याचे बैल धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेला असता बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. या घटनेमुळे पांझणदेव गावावर शोककळा पसरली असून, येथील पोळा सणावर दु:खाचे सावट होते.योगेश भगवान काळे (२४) हा युवक पोळ्याच्या सणासाठी महादेव मंदिर बंधाऱ्यावर बैल धुण्यासाठी गेला. बैल धुऊन झाल्यानंतर त्याने बैल बाहेर आणून झाडाला बांधले व तो अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरला. यागेश पट्टीचा पोहणारा असून, गावातील अनेक जणांना त्याने पोहण्याचे प्रशिक्षण दिले असल्याचे सांगण्यात येते. मात्र पोहण्याच्या कलेत पारंगत असलेल्या योगेशचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सदरची घटना समजताच परिसरातील नागरिकांनी बंधाऱ्यावर धाव घेतली. बंधाऱ्याला अथांग पाणी असल्याने मृतदेह शोधण्यासाठी अडचणी येत होत्या. तब्बल अडीच तासाच्या प्रयत्नांनंतर योगेशचा मृतदेह आढळून आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मनमाड येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)