शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गटारीत पडून दोन विद्यार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:17 IST

मालेगाव येथील नवीन बसस्थानकाजवळ असलेल्या मुख्य गटारीच्या खड्ड्यात सायकलसह दोन विद्यार्थी पडल्याने जखमी झाले असून एकावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. वेळीच नागरिकांनी पाहिल्याने खड्ड्यातील मुलांना बाहेर काढल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

आझादनगर : मालेगाव येथील नवीन बसस्थानकाजवळ असलेल्या मुख्य गटारीच्या खड्ड्यात सायकलसह दोन विद्यार्थी पडल्याने जखमी झाले असून एकावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. वेळीच नागरिकांनी पाहिल्याने खड्ड्यातील मुलांना बाहेर काढल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.अब्दुल्ला मुख्तार अहमद (११) व कैफ आलम इफ्तेखार अहमद (१२) हे दोघे सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानकाजवळील गटारीच्या खड्ड्यात पडले. घटनास्थळी नागरिकांनी संताप व्यक्त करीत रस्तारोको करण्याचा प्रयत्न केला. मनपा प्रभाग तीनचे अधिकारी किशोर गिडगे व स्वच्छता निरीक्षक इसा बेग यांनी नागरिकांची समजूत काढल्याने वादावर पडदा पडला. यावेळी मनपाच्या गलथान कारभाराचा नमुना नागरिकांना पहायला मिळाला. अब्दुल्ला मुख्तार अहमद व कैफ आलम हे एटीटी शाळेत पाचवी व सहावीच्या वर्गात शिकत आहेत. दुपारी सायकलने शाळेत जात असताना हा प्रकार घडला. सदर ठिकाणी वर्दळीचा भाग असल्याने नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. मोमीन अहमद शकील अहमद व काही तरूणांनी खड्ड्यात उडी घेत बुडणाºया अब्दुल्लास वाचविले.जनता दलाचे मुस्तकीम डिग्नीटी, सलीम शेख यांनी मनपा प्रभाग अधिकाºयांना पाचारण करून पंचनामा करुन घेतला. सदर गटारीचा खड्डा सात फूट खोल असून, येथेच चेंबर असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी व कचरा साचत असतो. यापूर्वी बदउन्वानी मुक्त संघटनेचे रिजवान बॅटरीवाला यांनी या खड्ड्यात उतरून आंदोलन केले होते. त्यावेळी चेंबरवर जाळी बसविण्यात आली होती; मात्र सदर जाळी नादुरुस्त झाल्याने चेंबरचा खड्डा उघडा पडला.याबाबत महापालिकेकडे पत्रव्यवहार करूनही दखल घेण्यात आली नाही. सदर घटनेस महापालिका जबाबदार असल्याने मनपाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी अपघातग्रस्त मुलाचे वडील मुख्तार अहमद यांनी केली आहे.