शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

आडगावला दोन विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून मृत्यू

By admin | Updated: July 24, 2016 02:08 IST

आडगावला दोन विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून मृत्यू

पंचवटी : आडगाव शिवारातील समर्थनगरमध्ये असलेल्या एका पडक्या विहिरीमध्ये बुडून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़२३) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली़ ओमकार श्रीराम कारंजकर (१३) व शुभम सोमनाथ शिंदे (१४, रा़दोघेही राहणार श्री स्वामी समर्थनगर, आडगाव शिवार, नाशिक) अशी या दुर्दैवी मुलांची नावे असून, शाळेतून घरी परतत असताना या दोघांनी या विहिरीमध्ये उडी मारल्याची चर्चा आहे़ दरम्यान, या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समर्थनगरमधील ओमकार कारंजकर हा पेठे विद्यालयात आठवीच्या वर्गात, तर शुभम शिंदे हा आडगावच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकत होता़ शनिवारी सकाळी लवकर शाळा सुटल्यानंतर हे दोघेही मित्र मदर तेरेसा आश्रमाच्या संरक्षण भिंतीच्या पाठीमागे असलेल्या अंडे यांच्या शेतातील रस्त्याने घरी जात होते़ या रस्त्यावर एक जुनी पडीक विहीर असून, पावसाच्या पाण्यामुळे ती पूर्णपणे भरलेली आहे़प्रथम ओमकार व त्यापाठोपाठ शुभमने या विहिरीत उडी मारली़ मात्र या या विहिरीत पाणी कमी व गाळ जास्त असल्याने हे दोघेही गाळात अडकले़ ही घटना पाहणाऱ्यांनी आरडाओरडही केली, मात्र तत्काळ मदत उपलब्ध झाली नाही़ या दोघांसोबत असलेल्या शुभम शिंदेच्या धाकट्या भावाने घरी पळत जाऊन हा प्रकार सांगितल्यानंतर सर्वांनी या विहिरीकडे धाव घेतली़ मात्र यापूर्वीच नीलेश अशोक जाधव या युवकाने ओमकारला पाण्याबाहेर काढून काठावरील नागरिकांना उपचारासाठी नेण्याची सूचना केली़ त्यानंतर शुभमच्या शोधासाठी नीलेश पुन्हा विहिरीत उतरला़ शुभम हा गाळात फसल्याने त्यास बाहेर काढण्यासाठी जाधवला वेळ लागला व तोपर्यंत आडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारीही हजर झाले़ पोलिसांनी ओमकारला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, तर शुभमचा अधिक वेळ पाण्यात असल्यामुळे त्याचाही मृत्यू झाला़. ओमकार हा कारंजकर कुटुंबीयांचा एकूलता एक मुलगा असून, त्याच्या पश्चात आई, वडील व एक बहीण असा परिवार आहे़ तर शुभम शिंदेच्या पश्चात आई, वडील व एक भाऊ असा परिवार आहे़ या घटनेमुळे आडगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे़ (वार्ताहर)