शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

दोन भावंडांचा तलावात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:08 IST

घोटी शहरातील महिला आपल्या दोन मुलांसह घराजवळील वनविभागाच्या तलावात कपडे धुण्यासाठी गेली असता एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात दोघा सख्ख्या भावंडांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. याबाबत घोटी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, या घटनेमुळे घोटी शहरात व्यक्त करण्यात येत आहे.

घोटी : घोटी शहरातील महिला आपल्या दोन मुलांसह घराजवळील वनविभागाच्या तलावात कपडे धुण्यासाठी गेली असता एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात दोघा सख्ख्या भावंडांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. याबाबत घोटी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, या घटनेमुळे घोटी शहरात व्यक्त करण्यात येत आहे.घोटी शहरातील आरोटेनगर विभागात राहणारी ज्योती जगदीश लहामगे ही महिला आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घरालगत असणाºया वनविभागाच्या तलावात कपडे धुण्यासाठी गेली होती. तिची नेहा जगदीश लहामगे (वय १४) व साहिल जगदीश लहामगे (वय १०) ही दोन्ही मुले कपडे धुण्यासाठी आपल्या आईला मदत करीत असताना या दोन्ही मुलांचा पाय घसरल्याने खोल पाण्यात बुडाली. दरम्यान, यावेळी ज्योती लहामगे यांनी आरडाओरड केल्याने तिचा भाऊ शिवाजी चोथे यांनी धाव घेऊन स्थानिक युवकाच्या मदतीने या दोन्ही मुलांना बाहेर काढण्यात यश मिळविले; मात्र ही दोन्ही मुले मृत अवस्थेत मिळून आली.दरम्यान, याबाबतची कल्पना संजय आरोटे यांनी घोटी पोलिसांना दिल्यानंतर सहाययक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, उपनिरीक्षक आनंद माळी, संदीप शिंदे, नितीन भालेराव, सुहास गोसावी आदींच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. या दोन्ही मृतदेहांचे घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे घोटी शहरात दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. घोटी परिसरात असलेल्या वनविभागाच्या या तलावात दोन भावंडांचा बुडून मृत्यू झाला