नगरसूल : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाºया वारकऱ्यांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने दि. ११ व १२ जुलै रोजी विशेष रेल्वेचीसोय केली आहे. या भागातील वारकºयांच्या सोयीसाठी नगरसूल रेल्वेस्थानकातून रेल्वेच्या दोन विशेष फेºया केल्या जाणार आहेत. नांदेड विभागातून सहा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.प्रतिवर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी या भागातील वारकरी भाविक मोठ्या संख्येने जात असतात. येत्या गुरुवारी (दि.१२) आषाढी एकादशी आहे. या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून भाविक मोठ्या संख्येने पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनाला येत असतात. या भाविकांना कमी खर्चात व सुरक्षित प्रवास करून दर्शन व्हावे यासाठी याही वर्षी आषाढी एकादशीचे औचित्य साधून ही विशेष रेल्वेची सोय करण्यात आलीआहे.यामुळे येवला, नांदगाव, निफाड, वैजापूर तालुक्यातील हजारो वारकºयांना या रेल्वेचा लाभ घेता येणार असून, विठुरायाचे दर्शन सुकर होणार आहे. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वेने सहा विशेष गाड्या चालविण्याचे ठरविले आहे. प्रवाशांच्या मागणीवरून नगरसूल व अकोला येथून सुटणाºया गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. गाडी संख्या ०७५१५ व ०७५१६ ही नगरसूल-पंढरपूर- नगरसूल अशा दोन फेºया करणार आहे.११ डबे असलेली ही गाडीनगरसूल येथून ११ जुलैला सकाळी ५ वाजता सुटणार आहे. रोटेगाव, परसोडा,लासूर मार्गे औरंगाबाद येथे ६.१५ वाजता पोहोचून ६.३० वाजता सुटेल. जालना, परतूर, सेलू, मानवतरोड मार्गे परभणी, गंगाखेड, परळी, लातूररोड,लातूर, उस्मानाबाद, बार्शी टाउन, कुर्डुवाडी मार्गे ही गाडी पंढरपूर येथे त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी ०७५१६ ही विशेष गाडी पंढरपूर तेथून १३ जुलैला सकाळी ८ वाजता सुटेल. भाविकांना थेट पंढरपुरात जाण्याचा प्रवासपरळी, परभणी जालना मार्गे गाडी औरंगाबाद येथे रात्री ११ वाजता पोहोचेल आणि १४ जुलैला मध्यरात्री १.३५ वाजता ही गाडी नगरसूलला पोहोचेल. या गाडीला ११ डबे असतील. दुसरी विशेष गाडी अकोला-पंढरपूर अकोला येथून ११ जुलैला सकाळी परभणी जालना मार्गे औरंगाबाद येथे रात्री ११ वाजता पोहोचेल आणि १४ जुलैला मध्यरात्री १.३५ वाजता ही गाडी नगरसूलला पोहोचेल. या गाडीला ११ डबे असतील. दुसरी गाडी अकोला-पंढरपूर ही विशेष गाडी अकोला येथून ११ जुलैला सकाळी ५.५० वाजता सुटेल. ही गाडी परभणी येथे नगरसूल-परभणी या गाडीला जोडण्यात येईल. ‘‘वारकरी व भाविकांसाठी रेल्वेने घेतलेल्या हा निर्णयाचे स्वागत आहे. यामुळे भक्त व वारकारी संप्रदायातील वयोवृद्धांना पायी चालून जाण्यापेक्षा भाविकांना थेट पंढरपुरात जाण्याचा प्रवास सुखकर होणार आहे. या रेल्वेचा परिसरातील भाविकांना लाभ होणार आहे.
नगरसूलहून विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 22:16 IST
नगरसूल : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाºया वारकऱ्यांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने दि. ११ व १२ जुलै रोजी विशेष रेल्वेची सोय केली आहे. या भागातील वारकºयांच्या सोयीसाठी नगरसूल रेल्वेस्थानकातून रेल्वेच्या दोन विशेष फेºया केल्या जाणार आहेत. नांदेड विभागातून सहा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
नगरसूलहून विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या
ठळक मुद्देआषाढी एकादशी । पंढरपूरसाठी नांदेड विभागातून सहा गाड्या