शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

जिल्ह्यात दोन रेशन दुकाने कॅशलेस

By admin | Updated: January 14, 2017 00:43 IST

देवळ्याची निवड : चालू आठवड्यात प्रारंभ

नाशिक : नोटाबंदीनंतर केंद्र व राज्य सरकारने रोकडविरहीत व्यवहाराला चालना देण्यासाठी विविध प्रयत्न अवलंबविले असून, त्याचाच भाग म्हणून देवळा तालुक्यातील दोन रेशन दुकानांमध्ये येत्या आठवड्यापासून शिधापत्रिकाधारकांना ‘कॅशलेस’ धान्य वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक वितरणप्रणालीत हे पहिले पाऊल असून, त्यासाठी देवळा येथील दुकान नंबर तीन व चिंचणे येथील दुकानाची निवड करण्यात आली आहे. यासाठी या दोन्ही दुकानांना जोडण्यात आलेल्या शिधापत्रिकाधारक व त्याच्या कुटुंबियातील व्यक्तींचे आधारक्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक गोळा करण्यात आले आहेत. याशिवाय कुटुंबप्रमुखाचे बॅँक खाते क्रमांकही नोंदविण्यात आले असून, ही सारी माहिती रेशन दुकानदाराकडील ‘स्वाईप’ यंत्राशी जोडण्यात आलेली आहे. शिधापत्रिकाधारकाला फक्त दुकानात जाताना सोबत भ्रमणध्वनी व धान्यासाठी पिशवी घेऊन जावे लागणार आहे. शिधापत्रिकाधारकासाठी देय असलेल्या धान्याच्या मोबदल्यातील रक्कम दुकानदाराकडील स्वाईप यंत्रावर बॅँक खाते क्रमांक व रक्कम टाकून परस्पर अदा होणार आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकाला रक्कम बाळगण्याची गरज नाही. नोटबंदीनंतर नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच हा प्रयोग होत आहे. केंद्र सरकारने चलनातून हजार व पाचशे रुपयांची नोट हद्दपार केल्यानंतर निर्माण झालेल्या चलन टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने कॅशलेस व्यवहारासाठी पुढाकार घेऊन त्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून शासकीय सेवादेखील कॅशलेस पद्धतीने देण्याला प्राधान्य देण्याचे ठरविण्यात आले आहे. गेल्या महिन्यात यासंदर्भात राष्ट्रीयीकृत बॅँकांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयात रेशन दुकानदारांची बैठक घेऊन त्यांना कॅशलेस व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन केले होते. (प्रतिनिधी)