नाशिक : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ अनिल दत्तात्रय जाधव (५७, रा़पोलीस मुख्यालय) व पुंडलीक मुरलीधर अहिरे (५४, रा़पोलीस मुख्यालय) अशी कर्मचाऱ्यांची नावे आहेत़ गंगापूर पोलीस ठाण्यात असलेले अनिल जाधव यांच्या छातीत शुक्रवारी (दि़२३) रात्री नऊ वाजेच्या सुमारास दुखू लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ ग्रामीण पोलीस दलातील मोटार विभागात कर्तव्यावर असलेले पुंडलिक अहिरे यांना शनिवारी (दि़२४) दुपारी बारा वाजेच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला़ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तीन वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला़ त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे़ (प्रतिनिधी)रविवार पेठेतून पैशांची बॅग लंपासनाशिक : दुकानाच्या काउंटरवर ठेवलेली ७५ हजार रुपयांची बॅग चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़२३) सकाळच्या सुमारास रविवार पेठेतील उन्नत ट्रेडिंग कंपनीमध्ये घडली़ रविवार पेठेत दिनेशभाई मानजीभाई पटेल यांचे उन्नत ट्रेडिंग कंपनीचे कार्यालय आहे़ सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्यांनी दुकानाच्या काउंटर पैशांची बॅग ठेवलेली होती़ ही बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली़
दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू
By admin | Updated: September 25, 2016 01:46 IST