शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

रेशन घोटाळ्यातील आणखी दोघा संशयितांना अटक

By admin | Updated: December 6, 2015 00:02 IST

रेशन घोटाळ्यातील आणखी दोघा संशयितांना अटक

नाशिक : कोट्यवधी रुपयांच्या रेशन धान्य घोटाळ्यातील घोरपडे बंधूंचे साथीदार काशीनाथ पाटील व ज्ञानेश्वर घुले या दोघा संशयितांना वाडीवऱ्हे पोलिसांनी शुक्रवारी (दि़४) अटक केली़ या दोघांसह पोलीस कोठडीची मुदत संपलेल्या लक्ष्मण पटेल या तिघांना विशेष मोक्का न्यायालयाच्या न्यायाधीश ऊर्मिला फलके-जोशी यांनी १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ दरम्यान, यातील प्रमुख सूत्रधार अरुण घोरपडे, त्यांची मुलगी पूनम होळकर व जितूभाई विरजी ठक्कर हे तिघे फरार आहेत़विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी पोलीस कोठडीची मागणी करताना युक्तिवादात सांगितले की, संशयित घोरपडे बंधू व त्यांच्या टोळीने सरकारी धान्याचा काळाबाजार करून प्रचंड पैसा कमावला़तसेच पैशांच्या व्यवहारासाठी त्यांनी दहा ते अकरा बोगस कंपन्या स्थापन केल्या़ त्यापैकी महालक्ष्मी कार्पोरेशनचा मालक संशयित काशीनाथ सदाशिव पाटील (३८, शिवशक्ती चौक, सिडको) हा असून धान्याची वाहनाद्वारे वाहतूक करणारे संशयित ज्ञानेश्वर दशरथ घुले (३४, पाथर्डी फाटा, नाशिक) या दोघांचा समावेश आहे़या घोटाळ्यातील संशयित लक्ष्मण धरमसी पटेल याच्या कंपनीला एका वर्षात १० लाखांचा, तर घोटाळा झाल्याच्या दुसऱ्या वर्षी सव्वा कोटी रुपयांचा नफा झाला़ त्यामुळे एका वर्षात इतका नफा कसा झाला? मूळचा रिक्षाचालक व महालक्ष्मी कार्पोरेशनचा मालक काशीनाथ पाटील याच्या कंपनीतून ६६ लाख रुपये देण्यात आले आहेत़ तर घोरपडे बंधूंना धान्य पोहोचविण्यासाठी वाहन पुरविणारे व ज्ञानेश्वर घुले याने फरार कालावधीत मदत केल्याने या दोघांच्याही पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली़ संशयित लक्ष्मण पटेल याचे वकील अ‍ॅड़ राहुल कासलीवाल यांनी मोक्का कायद्यान्वये कारवाई योग्य नसल्याचा युक्तिवाद केला, तर पाटील व घुले यांच्या वकील अ‍ॅड़ शबनम मेनन यांनी संशयित रिक्षाचालक काशीनाथ पाटील याच्या नावावर महालक्ष्मी कार्पोरेशन नावाची कंपनी असल्याचे, तसेच ज्ञानेश्वर घुले शेतकरी असून त्याचा सहभाग नसल्याचे सांगितले़ दोन्ही बाजूच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर संशयित पाटील व घुले या दोघांसह कोठडीची मुदत संपलेले पटेल यांना १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ दरम्यान, या रेशन घोटाळ्यातील संशयित संपत घोरपडे, विश्वास घोरपडे (रा़ १०, विश्वास बंगला, गोविंदनगर, नाशिक), मगन पवार व रमेश पाटणकर (दोघेही रा़ शिवशक्ती चौक, सिडको) हे चौघे ९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहेत़ (प्रतिनिधी)