शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

आणखी दोन राज्यमार्ग महापालिकेकडे हस्तांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:37 IST

नाशिक : राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिका हद्दीतील नाशिक-पेठ या राज्यमार्गावरील ११.६०० कि.मी.चा रस्ता तसेच नाशिक-औरंगाबाद राज्यमार्गावरील आडगाव नाका ते मानूर जकात नाक्यापर्यंतचा ५.४०० कि.मी. रस्ता नाशिक महापालिकेकडे अवर्गीकृत (डिनोटिफाईड) म्हणजेच हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, रस्ते हस्तांतरित करताना दुरुस्ती व देखभालीचा खर्च महापालिकेच्याच माथी मारला आहे.सर्वोच्च न्यायालयाने ...

नाशिक : राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिका हद्दीतील नाशिक-पेठ या राज्यमार्गावरील ११.६०० कि.मी.चा रस्ता तसेच नाशिक-औरंगाबाद राज्यमार्गावरील आडगाव नाका ते मानूर जकात नाक्यापर्यंतचा ५.४०० कि.मी. रस्ता नाशिक महापालिकेकडे अवर्गीकृत (डिनोटिफाईड) म्हणजेच हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, रस्ते हस्तांतरित करताना दुरुस्ती व देखभालीचा खर्च महापालिकेच्याच माथी मारला आहे.सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावरील पाचशे मीटर अंतरावर असलेल्या मद्यविक्रीच्या दुकानांवर बंदी घातल्यानंतर राज्य व राष्टÑीय महामार्गाच्या हस्तांतरणाचा मुद्दा पेटला होता. सदर रस्ते हस्तांतरणाबाबत मद्यविक्रेत्यांची लॉबीच सक्रिय झाली होती.आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्षडहाणू-नाशिक-त्र्यंबक आणि नाशिक-दिंडोरी-वणी हे दोन राज्यमार्ग महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते, सन २००१-०२ मध्येच हस्तांतरित झाले असून, त्याची देखभाल-दुरुस्तीही महापालिकाच करत आहे. सदर मार्ग अवर्गीकृत (डिनोटिफाईड) करण्याचा संपूर्ण अधिकार हा राज्य शासनाचा आहे. या अवर्गीकृतकरणामुळे महापालिकेवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. मात्र, उर्वरित तीन राज्यमार्ग हस्तांतरित करताना शासनाकडे निधीचीही मागणी करणारा प्रस्ताव पाठविला जाईल, अशी भूमिका त्यांनी त्यावेळी घेतली होती. आता सदर दोन्ही रस्ते महापालिकेकडे अवर्गीकृत झाल्याने आणि शासनाने त्याबाबतचे कसलेही दायित्व स्वीकारण्यास नकार दिल्याने आयुक्त नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून असणार आहे.अभिलेखच उपलब्ध नाहीमहापालिकेने शासनाला सहा रस्त्यांची माहिती पाठविली होती. त्यात शहरातून जाणारे पाचपैकी तीन राज्यमार्ग हे मनपाकडे हस्तांतरितच झाले नसल्याचे आणि त्यासंबंधीची कागदपत्रेही उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. नाशिक-पेठ राज्यमार्ग क्रमांक ३७ हा पेठनाका ते मनपा हद्दीपर्यंत ११.६०० कि.मी.चा आहे. सदर रस्ता मनपा हद्दीपर्यंत नाशिक महापालिकेकडे दुरुस्ती व देखभालीसाठी वर्ग करण्यात आलेला आहे, परंतु त्याबाबतचे कोणतेही ठराव व हस्तांतरणाबाबतचा शासननिर्णय अभिलेखात आढळून आलेला नाही. सदरच्या रस्त्याची महापालिकेमार्फत दुरुस्ती व देखभाल करण्यात येत आहे आणि महापालिकेच्या विकास योजना आराखड्यातही तो ३० मीटर रुंदीचा डी.पी. रस्ता म्हणून दर्शविलेला आहे.